पार्किगचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात

By Admin | Updated: August 23, 2014 01:11 IST2014-08-23T01:11:32+5:302014-08-23T01:11:32+5:30

दीड, पाच व दहा दिवसांच्या गणपती विसजर्नाला दादर चौपाटीवर धडकणा:या हजारो वाहनांना शिवाजी पार्क मैदानात पार्किग करता यावे, यासाठी यंदाही राज्य शासनाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आह़े

The issue of parking again in the high court | पार्किगचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात

पार्किगचा मुद्दा पुन्हा हायकोर्टात

 मुंबई : दीड, पाच व दहा दिवसांच्या गणपती विसजर्नाला दादर चौपाटीवर धडकणा:या हजारो वाहनांना शिवाजी पार्क मैदानात पार्किग करता यावे, यासाठी यंदाही राज्य शासनाने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आह़े

महत्त्वाचे म्हणजे विसजर्नाच्या पार्किगेवर तोडगा काढण्यासाठी गेल्या वर्षी न्यायालयाने समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होत़े त्यानुसार पोलीस व महापालिका अधिकारी यांच्या संयुक्त समितीने बापट मार्गाचा पर्याय पार्किगसाठी सुचवला़ मात्र, हा पर्याय योग्य नसल्याचा दावा करत यंदाच्या वर्षीही शिवाजी पार्क मैदानातच पार्किगला परवानगी द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज शासनाने न्यायालयात दाखल केला असून यावर येत्या सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आह़े
हे मैदान शांतता क्षेत्र घोषित झाल्यानंतर येथे सभा किंवा पार्किग करायची असल्यास न्यायालयाची परवानगी बंधनकारक असत़े त्यामुळे दोन वर्षापूर्वी शासनाने येथे पार्किगसाठी परवानगी मागितली़ त्या वेळी न्यायालयाने ही परवानगी दिली़ तेव्हा यासाठी समिती नेमून पर्यायी जागा शोधण्याचे आदेशही शासनाला दिले होत़े पण गेल्या वर्षार्पयत पर्यायी जागा काही सापडली नाही़ अखेर हतबल होऊन शासनाने गेल्या वर्षी गणपती उत्सव जवळ आल्यानंतर न्यायालयात धाव घेतली़ त्या वेळीही पार्किगसाठी जागा न शोधल्याने न्यायालयाने शासनाचे कान उपटले होते व पर्यायी जागा शोधण्याचे आदेश दिल़े अखेर शासनाने यासाठी समिती नेमून पर्यायी जागेचा शोध घेतला़ पण समितीने सुचवलेला बापट मार्गाचा पर्याय शासनाला मान्य झाला नाही़ (प्रतिनिधी)
 
वीजचोरीवर नजर
गणपती व इतर उत्सवांमध्ये होणा:या वीजचोरीवर लक्ष ठेवण्यासाठी एका विशेष पथकाची राज्य शासनाने स्थापना केली असून या पथकात पालिका व पोलीस अधिकारी असणार आह़े उत्सव मंडळे तात्पुरत्या स्वरूपाचे वीज कनेक्शन घेतात़ मात्र याद्वारे मोठय़ा प्रमाणात वीजचोरी होत़े त्यामुळे यावर लक्ष ठेवण्यासाठी पथक नेमावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती़ त्यावर शासनाने हे प्रत्युत्तर दिले.
 
बापट मार्गापासून चौपाटी खूप लांब आह़े तेथे वाहन पार्क करून गणपतीची मूर्ती चौपाटीर्पयत नेणो अशक्य होत़े त्यापेक्षा शिवाजी पार्क मैदानात वाहन पार्क केल्यानंतर तेथून चौपाटीवर विसजर्नासाठी जाणो गणोशभक्तांना अगदी सोपे आह़े तसेच मैदानात वाहन उभे केल्याने वाहतुकीचीही कोंडी होत नाही़
 
सलग तिस:या वर्षी राज्य शासन उच्च न्यायालयात शिवाजी पार्कसाठी गेले आहे. शासनाने शोध घेऊनही त्यांना शिवाजी पार्क वगळता अन्य जागा मिळालेली नाही. त्यामुळे सध्या तरी शिवाजी पार्कशिवाय कोणताही सक्षम पर्याय नसल्याचेच समोर येत आहे.
 
दीड दिवसाच्या विसजर्नाला शेकडो भाविक मूर्ती घेऊन चौपाटीवर दाखल होतात. त्यामुळे वाहनांची संख्या पाचशेपेक्षा अधिक असत़े
 
पाच दिवसांच्या विसजर्नाला हा आकडा काही हजार मूर्तीच्या घरात जातो़ या वेळी येथे हजारोंच्या संख्येने वाहने दाखल होतात़ 
 
दहा दिवसांच्या विसजर्नाला येथे अंदाजे दहा हजार वाहने दाखल होतात़ 

Web Title: The issue of parking again in the high court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.