शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अवैध कीटकनाशकांची विक्री करणा-यांवर मोक्कासारखे गुन्हे दाखल करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2017 12:19 IST

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीच्या विषबाधेने २१ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला, तर चारशेवर बाधित झाले.

यवतमाळ - परवानगी नसताना कीटकनाशकांची विक्री करणा-या कंपन्या आणि विक्रेत्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारी स्वरूपाचे (मोक्का) गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले. 

यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीच्या विषबाधेने २१ शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला, तर चारशेवर बाधित झाले. या शेतक-यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी यवतमाळात आले होते. त्यांनी येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. अवैध कीटकनाशकांची विक्री करणा-या कृषी केंद्र आणि कंपन्यांचा शोध घेवून त्यांच्यावर मोक्कासारखे गुन्हे दाखल करावे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. 

वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य विभाग आणि कृषी विभागातील रिक्त पदांचा त्यांनी आढावा घेतला. रिक्त पदे तत्काळ भरण्याचे आदेश दिले. येथे नियुक्त होणा-या डॉक्टरांकडून बाँड लिहून घेण्यास सांगितले. कराराचा भंग करीत कुणी नोकरी सोडली तर त्यांना पुन्हा कधीही शासकीय सेवेत घेतले जाणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच कृषी आणि आरोग्य विभागाची यंत्रणा सतत अलर्ट ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले. 

या बैठकीला पालकमंत्री मदन येरावार, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, आमदार प्रा.डॉ.अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीष्ठाता आणि कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

मेडिकलच्या ‘त्या’ डॉक्टरांवर कारवाईशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सेवा देणा-या आणि शहरात खासगी प्रॅक्टीस करणा-या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना दिले. यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात शासनाचा विशेष भत्ता घेऊनही ११ डॉक्टर खासगी प्रॅक्टीस करीत असल्याचे पुढे आले. या डॉक्टरांबाबत मुख्यमंत्र्यांनी कडक निर्देश देत त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस