शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
4
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
5
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
6
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
7
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
8
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
9
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
10
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
11
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
12
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
13
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
14
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
15
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
16
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
17
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
18
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
19
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
20
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका

‘’कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी अन्यथा…’’ काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 18:20 IST

Congress News: हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केला होता. त्यावरून आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई - राज्याचे कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे हे त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केला होता. त्यावरून आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचे डोके ठिकाणावर आहे का?, मुख्यमंत्र्यांनी कृषिमंत्र्यांना समज द्यावी अन्यथा शेतकरी आणि काँग्रेसच समज देईल, असा इशारा काँग्रेसचे प्रधेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, “माझ्या मंत्रिमंडळातील कोणालाही चुकीचे काम करू देत नाही” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते पण त्यांचेच सहकारी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने वायफळ बडबड करुन शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत. आधी या मंत्र्याने शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली, कर्जमाफीतून शेतकरी मुलींची लग्ने करतात, साखरपुडे करतात अशी मुक्ताफळे उधळली आता त्यांनी ढेकळाचे पंचनामे करू का? असा उद्धट प्रश्न केला आहे. या कृषी मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल करत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या मंत्र्याला समज द्यावी अन्यथा काँग्रेस व शेतकरीच त्यांना योग्य ती समज देतील, असा इशारा सपकाळ यांनी दिला आहे.

केंद्रातील भाजपा सरकार शेतमालाच्या हमी भावात वाढ करून शेतकऱ्यावर उपकार केल्याचा अविर्भाव आणत आहे. परंतु ही वाढ अत्यंत तुटपुंजी असून सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. काँग्रेसप्रणित डॉ. मनमोहनसिंह सरकारने २००४ ते २०१४ या १० वर्षात हमीभावात १२० ते १५० टक्के वाढ दिली तर २०१४ ते २०२४ काळात मोदी सरकारने या तुलनेत केवळ ४५ टक्केच वाढ केली आहे. एमएसपीमधील ही किरकोळ वाढ म्हणजे राजा उदार झाला दिला आणि हाती भोपळा दिला अशीच आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले की, सरकारने एकीकडे हमी भावात थोडीशी वाढ करून दुसरीकडे शेतीसाठी लागणा-या साहित्यात प्रचंड महागाई केली आहे. युपीए सरकारच्या काळात ४८ रुपये लिटर असलेले डिझेल आता ९६ रुपयांवर गेले आहे. किटकनाशके, खते व वीजेवरील सबसीडी बंद करण्यात आली आहे. कृषी साहित्यावर १८ टक्के जीसीएसटी लावून शेतकऱ्याला लुटले जात आहे. त्यामुळे एमएसपी मधील वाढ ही दिखावा आहे. वाढत्या महागाईमुळे ती प्रत्यक्षात शेतक-यांना मिळतच नाही. शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे, शेती हे सर्वात जास्त रोजगार देणारे क्षेत्र आहे. पण दुर्देवाने तेच भाजपाच्या सत्ताकाळात दुर्लक्षित आहे.

२०२३-२४ सालात देशात ज्वारीचे उत्पादन ४७ लाख ३७ हजार टन झाले पण फक्त फक्त ३ लाख २३ हजार टन खरेदी केली. मक्याचे उत्पादन ३७६ लाख ६५ हजार टन झाले सरकारने फक्त ५ हजार टन खरेदी केली. बाजरीचे उत्पादन १०७ लाख १६ हजार टन झाले मात्र सरकारी खरेदी फक्त ७ लाख टनांचीच झाली. नाचणी (रागी) चे उत्पादन  १६ लाख ७० हजार टन झाले, सरकारी खरेदी फक्त २ लाख ३१ हजार टनांची झाली. हरभ-याचे उत्पादन ११५ लाख ७६ हजार टन झाले पण सरकारी खरेदी फक्त ४३ हजार टनांचीच झाली. यामुळे शेतकऱ्यांना  बहुतांश शेतमालाची अत्यंत कमी भावात खासगी व्यापा-याला विक्री करावी लागली त्यामुळे त्याचे मोठे आर्थिक नुकसान होतं आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी सरकार घोषणा करते पण खरेदी केंद्रांची बोंबाबोंब असते. ही खरेदी केंद्रे सुरु झाली तरी त्याच्या किचकट प्रक्रियेमुळे त्याचा फायदा शेतक-यांपेक्षा व्यापारीच घेतात. यावर्षी सोयाबीनचा सरकारी खरेदी दर ४८०० रुपये होता प्रत्यक्षात शेतक-यांना ४ हजार रुपये एवढ्याच दराने आपला माल खासगी व्यापा-यांना विकावा लागला. संसदेच्या कृषी विभागाच्या स्थायी समितीने आपल्या अहवालात MSP ला कायदेशीर हमी देण्याची व शेती आणि शेतकऱ्यांवर लावलेला कर काढून टाकण्याची शिफारस केली होती पण सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही. काँग्रेस पक्षाने एमएसपीला कायदेशीर हमीचा कायदा करण्याचे आश्वासन दिले आहे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास त्याची अंमलबजावणी नक्की करेल. 

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेHarshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र