शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
3
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
4
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
5
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
6
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
7
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
9
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
10
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
11
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
12
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
13
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
14
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
15
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
16
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
17
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
18
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
19
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
20
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी

'दरड कोसळून शेकडो लोक रस्त्यावर आले असताना वाढदिवसाच्या पार्ट्या कशा करता?', नाना पटोलेंचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2023 16:45 IST

Raigad Irshalwadi Landslide Incident: रायगडमधील इरसाळवाडीत दरड कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. अशा घटना घडल्यानंतर सरकार जागे होते व उपाय योजनांच्या घोषणा करते, पण अशा घटना घडू नयेत म्हणून आधीच काही उपयायोजना का केल्या जात नाहीत.

मुंबई -  रायगडमधील इरसाळवाडीत दरड कोसळल्याची घटना अत्यंत दुर्दैवी व ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. अशा घटना घडल्यानंतर सरकार जागे होते व उपाय योजनांच्या घोषणा करते, पण अशा घटना घडू नयेत म्हणून आधीच काही उपयायोजना का केल्या जात नाहीत. कोकणात याआधीही अशा दुर्घटना घडल्या पण त्यातून बोध काहीच घेतलेला दिसत नाही. इरसाळवाडी दुर्घटनेने राज्यावर शोककळा पसरली आहे, शेकडो लोकांची कुटुंबं रस्त्यावर आली आहेत आणि उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या पार्ट्या झोडल्या जात आहेत, एवढे आपण असंवेदनशील  कसे? असा संतप्त सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.

इरसाळवाडी दरड दुर्घटनेवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांमध्ये जरा तरी संवेदना उरल्या आहेत का? समृद्धी महामार्गावर अपघात होऊन २६ लोक मृत्यूमुखी पडलेले असताना हेच सत्ताधारी दुसऱ्याचा पक्ष फोडून राजभवनवर थाटात शपथविधी सोहळा करत होते आणि आता इरसाळवाडी येथे गरिब, नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असताना वाढदिवसाच्या पार्ट्या करत आहेत. शिंदे-फडणवीस-पवार सरकारने सगळी लाजलज्जा सोडून दिली आहे का? विरोधी पक्ष या नैसर्गिक अपघाताचे राजकारण करत नाही पण सत्ताधारी पक्षाला जनाची नाही तर मनाची तरी असायला हवी, पण या लोकांनी सर्वच सोडून दिली आहे. लोक मत्युमुखी पडले आहेत, अनेक जण हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. ज्या घरातील लोक मरण पावले त्यांचे डोळे पुसण्याचे, त्यांना आधार देण्याचे काम सरकारने केले पाहिजे पण हे सरकारच उफराट्या काळजाचे आहे, असा संताप पटोले यांनी व्यक्त केला.

डॉ. मनमोहनसिंह सरकार असताना पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी माधवराव गाडगीळ समिती स्थापन केली होती. माधवराव गाडगीळ समितीने दिलेल्या अहवालाचा विचार झाला पाहिजे होता, त्याची अंमलबजावणी व्हायला हवी होती पण ती झालेली नाही. सरकार तज्ञांची समिती गठीत करते त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केला जातो पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही. इरसाळवाडी सारख्या घटनांमधून आपण काही बोध घेतला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही हे दुर्दैवी आहे, असेही पटोले म्हणाले. नाना पटोले यांनी रायगडच्या खालापूर तालुक्यातील इरसाळवाडी दुर्घटना स्थळाला भेट देऊन माहिती घेतली व मदत कार्याची पाहणीही केली.

टॅग्स :Raigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरणNana Patoleनाना पटोलेAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार