इरले-घोंगडी होताहेत नामशेष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:28 IST2019-07-13T23:27:40+5:302019-07-13T23:28:30+5:30

पावसाळा सुरू झाला की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लगबग सुरू होते.

Irreplacement | इरले-घोंगडी होताहेत नामशेष

इरले-घोंगडी होताहेत नामशेष

- विनोद भोईर 

पाली : पावसाळा सुरू झाला की, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची लगबग सुरू होते. शेती व्यवसायातील सामानाची जुळवाजुळव करण्यात शेतकरी सध्या व्यस्त असून पेरणी, लावणीच्या कामासाठी वापरण्यात येणाºया अनेक साहित्यांपैकी इरले-घोंगडी यांनाही तितकेच महत्त्व आहे. याचा उपयोग प्रामुख्याने शेतकरी पावसात भातशेतीचे काम करत असताना भिजू नये म्हणून आणि शरीराला ऊब मिळण्यासाठी इरले-घोंगडी पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात वापरतात. याचा वापर प्रामुख्याने आदिवासी शेतकरी जास्त करीत असतात; परंतु सध्या आधुनिक युगात रेनकोटचा आणि पांघरता येणाºया प्लॅस्टिकचा वापर वाढतो आहे. मेहनत करून वस्तू तयार करण्यापेक्षा तयार वस्तू बाजारात मिळत असल्याने इरले-घोंगडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
पावसाळ्यात सुधागड तालुक्यातील ग्रामीण भागातील आदिवासी लोक पळसाची पाने, बांबू आणि अंबाडीचे सूत (दोरा) काढून इरले-घोंगडी बनविण्याचे काम करताना दिसतात. यातून आदिवासींना पैसेही मिळतात; परंतु जसा काळ बदलत चाललेला आहे, तशा प्रकारच्या रूढी, परंपरा व व्यवसाय, साधनेदेखील बदलत जाऊन त्याची जागा अत्याधुनिक साधनांनी घेतली आहे. शेतीमधून बैल, नांगर हद्दपार होऊन त्याची जागा ट्रॅक्टरने व टीलरने घेतली आहे. तसेच इरले-घोंगडी बनविण्याचा व्यवसायही बदलत्या काळानुसार संपुष्टात येत आहे.
पूर्वी पावसाळा सुरू झाला की, शेतकरी इरले-घोंगडी बनविणाºया व्यावसायिकांना आॅर्डर द्यायचे; पण आज या इरले-घोंंगडीचा विसर खुद्द शेतकऱ्यांनाच पडला आहे. रेनकोट, गमबूट, प्लॅस्टिक टोप्या, मेनकापड यांच्या खरेदीसाठी शेतकºयांची गर्दी होऊ लागली आहे; परंतु इरले-घोंगडी बनविणाºयाकडे कुणीही फिरकलेले नाही. ५०० ते १००० रुपयांत मिळणाºया प्लॅस्टिकचा कोट पावसापासून जरी बचाव करीत असला तरी इरले-घोंगडीप्रमाणे थंडीपासून बचाव करणारा नाही, शरीराला ऊब देणारा नाही; पण हे लक्षात घेतो कोण? हेच इरले अवघ्या ३०० ते ४०० रुपयांत तर घोंगडी ५०० ते ६०० रुपयांपर्यंत मिळत असे. इरले-घोंगडी हे पाच ते सहा वर्षांपर्यंत वापरता येते; परंतु सध्या इरले-घोंगडीचा वापर खूप कमी झाल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
>प्लॅस्टिकने घेतली इरले-घोंगड्यांची जागा
शेतीच्या कामात वापरल्या जाणाºया इरले-घोंगडीची जागा आता रेनकोट, प्लॅस्टिक, प्लॅस्टिक टोप्या, मेनकापड यांनी घेतल्यामुळे इरले-घोंगडी बनविण्याच्या पारंपरिक व्यवसायावर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. पावसाळा सुरू झाला की बाजारात रेनकोट, मेनकापड, प्लॅस्टिक उपलब्ध होते. इरले-घोंगडी तयार करण्याचे साहित्य मिळत नसल्यामुळेही आदिवासी समाजातील कामगारांना मजुरी करून अन्य काम करून पोट भरावे लागत आहे.

Web Title: Irreplacement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.