शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

अनंतपूरमधील इरकर कुटुंब नजरकैदेत, वैकुंठाला जाण्याचा हट्ट कायम 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 13:29 IST

सध्या पुण्याहून आलेल्या भक्तांना शासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणेने परत पुण्याला पाठवण्याची व्यवस्था केली

अथणी : कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या अनंतपूर येथील इरकर वस्तीवरील तुकाराम इरकरसह २० जणांना ८ सप्टेंबर रोजी वैकुंठवाशी होण्याच्या निर्णयापासून परावृत्त करण्यासाठी शासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे. सध्या इरकर कुटुंब नजरकैदेमध्ये असून, घरासमोर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा विषय चर्चेचा बनला आहे. इरकर यांनी वैकुंठाला जाण्याचा हट्ट कायम ठेवला आहे. सध्या चार भिंतींमध्ये देवाच्या भक्तीमध्ये ते मग्न आहेत.सध्या पुण्याहून आलेल्या भक्तांना शासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणेने परत पुण्याला पाठवण्याची व्यवस्था केली आहे. सध्या फक्त पाच भक्त इरकर कुटुंबातील आहेत. सर्वजण दररोज सकाळी चतकोर चपाती पाण्यामध्ये भिजवून खात आहेत. त्यांची प्रकृती क्षीण झाली आहे. शासकीय यंत्रणेने त्यांना दवाखान्यामध्ये दाखल केल्यास त्यांची प्रकृती सुधारू शकेल. त्या निर्णयापासून दूर राहू शकतात. यासाठी शासकीय यंत्रणेने प्रयत्न करण्याची मागणी होत आहे.

वाचा- म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ

दिवसभर कुटुंबाकडून भक्तीइरकर कुटुंब सध्या भक्तीमध्ये मग्न आहे. संपूर्ण घर रिकामे आहे. महाराजांच्या खुर्चीसमोर एक पुस्तक असून, प्रत्येक तासाला लोटांगण घालत आहेत. अथणी तालुक्यातील अनेक गावातील लोकांनी विनवणी केली आहे. डफळापूर, कोकळे, जत, बाज, कवठेमहांकाळ, सलगरे, मिरज, सांगली, विटा, तासगाव येथून लोक येऊन परिवर्तनाचा प्रयत्न करत आहेत.

मी स्वतः भेट देऊन समज दिली. परंतु ते ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे त्यांना मानसोपचार केंद्रात दाखल करावे. त्वरित राष्ट्रीय मानव हक्क आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे. सरकारने वेळीच दखल घेऊन कारवाई नाही केली तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. -ॲड. एस. एस. पाटील