मुंबई - अजित पवारांच्या विमान अपघातातील कंपनी VSR वर बेजबाबदारपणाचा आरोप करत आमदार रोहित पवारांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना २०२३ साली व्हिएसआर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे परदेशात शिंदेंचे विमान पाडले गेले असते. जो प्रकार अजित पवारांसोबत झाला तसाच काही प्रकार शिंदेसोबत बाहेर होणार होता का असा प्रश्न उपस्थित करत याबाबत एकनाथ शिंदे सांगू शकतात असं विधान आमदार रोहित पवार यांनी केले आहे.
आमदार रोहित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या २०२३ च्या दावोस दौऱ्याबाबत उल्लेख केला. पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, १६ ते २० जानेवारी २०२३ या काळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भूषण गगराणी व्हिएसआर कंपनीच्या VT-CMR विमानातून प्रवास करत होते. या विमानात अमित शुक्ला पायलट इन कमांड होते. मुंबईतून या विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पहिल्यांदा इंधन भरण्यासाठी ते बहरीन येथे थांबले. त्यानंतर बहरीनमधून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान इराणच्या हवाई क्षेत्रातून जात होते. तेव्हा ओव्हरफ्लाईट परवानगी नसल्यामुळे या विमानाला परत जाण्याचा आदेश देण्यात आला, अन्यथा इराणी लढाऊ विमानांकडून ते पाडले जाईल असा इशाराही दिला होता असं त्यांनी म्हटलं.
तसेच इराणच्या धमकीनंतर या विमानाने मार्ग बदलून इराकच्या हवाई क्षेत्रातून जाण्याचा निर्णय घेतला. परंतु तेथेही तात्काळ हवाई क्षेत्र सोडण्याचा आदेश विमानाला देण्यात आला. इराणसोबत इराकनेही हे विमान पाडण्याचा इशारा दिला. त्यानंतर इंधन कमी असल्याने हे विमान पुन्हा बहरीनला आले. तिथे ३ तास हे विमान थांबले. तिथून आवश्यक परवानग्या घेऊन हे विमान झुरिचकडे रवाना झाले. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत VSR कंपनीकडून असा प्रकार करण्यात आला त्यावरून ही कंपनी किती बेजबाबदारपणे वागत होती हे लक्षात येते असं आमदार रोहित पवारांनी सांगितले.
दरम्यान, आमच्याकडे जी माहिती आली ती समोर आणली आहे. VSR कंपनीवर विश्वास ठेवता येत नाही. कधी काय होईल हे सांगता येत नाही. एकनाथ शिंदेंबाबत हे घडले याची माहिती मिळाली. VSR कंपनीवर UAE ने सहा महिन्यासाठी बंदी आणली होती. कोविडच्या काळात लोक अडचणीत होते तेव्हा पैसे कमावण्याच्या नादात रुग्णांकडून भरमसाठ पैसा VSR कंपनी घेत होते. प्रायव्हेट चार्टर विमान एक व्यक्ती किंवा कंपनी बुक करू शकते परंतु त्यातील सीट विकता येत नाही. त्यासाठी तुम्हाला व्यावसायिक परवानगी लागते. VSR कंपनीने या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे UAE मध्ये त्यांना सहा महिन्यासाठी बंदी आणली होती असा आरोप रोहित पवार यांनी केला.
Web Summary : Rohit Pawar alleges that Eknath Shinde's plane, during his 2023 Davos trip, faced a near-disaster due to VSR company's negligence. The plane was almost shot down in Iranian airspace due to lacking overflight permissions. Pawar questions VSR's safety record, highlighting past UAE bans.
Web Summary : रोहित पवार ने आरोप लगाया कि 2023 में दावोस यात्रा के दौरान एकनाथ शिंदे का विमान वीएसआर कंपनी की लापरवाही के कारण दुर्घटनाग्रस्त होने से बाल-बाल बचा। विमान को ओवरफ्लाइट अनुमति न होने के कारण ईरानी हवाई क्षेत्र में लगभग मार गिराया गया था। पवार ने वीएसआर के सुरक्षा रिकॉर्ड पर सवाल उठाए और यूएई में पहले लगे प्रतिबंधों पर प्रकाश डाला।