शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलनातील अल्पवयीन मुलांचा सहभाग चिंताजनक, अटक ५२ जणांमध्ये १६ अल्पवयीन आंदोलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 05:56 IST

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे बुधवारी मुंबई ठप्प झाली. दुसरीकडे आंदोलनात सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळेच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे.

मुंबई - कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदमुळे बुधवारी मुंबई ठप्प झाली. दुसरीकडे आंदोलनात सहभागी झालेल्या अल्पवयीन मुलांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळेच आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून स्पष्ट होत आहे. मुंबईतल्या विविध भागांत दोन दिवसांत २५ गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये ४०० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर ५२ जणांना अटक करण्यात आली आहे. ५२ जणांमध्ये १६ अल्पवयीन आंदोलक आहेत. हिंसक आंदोलनात मुलांचा वाढता सहभाग चिंताजनक असल्याची प्रतिक्रिया पोलिसांसह सर्वच स्तरांतून उमटत आहे.कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ मंगळवारपासूनच दुकाने बंद करण्यात आली. बुधवारी बंदच्या दिवशी घाटकोपर, रमाबाईनगर येथून या आंदोलनाने हिंसक वळण घेतले आणि क्षणार्धात या आंदोलनाचे लोण मुंबईभर पसरले. मंगळवारी मुंबई पोलिसांनी ९ गुन्हे दाखल करून १०० जणांना ताब्यात घेतले होते. बुधवारी रात्री उशिरापर्यंत १६ गुन्हे दाखल करून ३०० आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. दोन दिवसांत ताब्यात घेतलेल्या४०० जणांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे.विचार करायला लावणारी बाबसार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायदा व भादंवि कायद्यान्वये दोन दिवसांत२५ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती प्रभारी पोलीस प्रवक्ते सचिन पाटील यांनी दिली. हिंसाचारात अल्पवयीन मुलांचा पुढाकार ही विचार करायला लावणारी बाब असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे....म्हणूनच केला मुलांचा वापरलहान मुले दगड फेकून सहज पसार होऊ शकतात. म्हणूनच आंदोलनात मुलांचा वापर करण्यात आल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. 

टॅग्स :Bhima-koregaonभीमा-कोरेगावPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्र