मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले निमंत्रण!
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:47+5:302016-01-02T08:34:47+5:30
मुक्ताईनगर येथील कार्यक्रम आटोपून माघारी निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी विमान थांबवून शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक

मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले निमंत्रण!
जळगाव : मुक्ताईनगर येथील कार्यक्रम आटोपून माघारी निघालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दुपारी विमान थांबवून शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी (सातारा) यांच्याकडून गडकोट मोहिमेच्या समारोपाची निमंत्रणपत्रिका स्वीकारली.
मुक्ताईनगर येथील आदिशक्ती मुक्ताई सूतगिरणी उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री दुपारी तीन वाजेच्या सुमारास जळगाव विमानतळावर दाखल झाले. कार्यकर्त्यांच्या भेटी, चर्चा करीत
ते विमानाकडे जात होते.
सोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे व भाजपाचे कार्यकर्ते होते. सर्वांचा निरोप घेऊन फडणवीस विमानात
दाखल झाले. विमानाचे इंजिन सुरू होऊन प्रवेशद्वारही बंद झाले.
तेवढ्यात गर्दीतून भिडे गुरुजी धावपट्टीवरून विमानाच्या दिशेने धावत आले. हा प्रकार लक्षात येताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी विमान थांबवून दरवाजा उघडण्यास सांगितले.
भिडे गुरुजींना विमानात आल्यावर त्यांनी दिलेली निमंत्रणपत्रिका मुख्यमंत्र्यांनी स्वीकारली. या प्रकाराने सुरक्षा यंत्रणेतील अधिकाऱ्यांची धावपळ झाली. (प्रतिनिधी)