शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रामधील गुंतवणूक तिपटीने वाढली - देवेंद्र फडणवीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 20:45 IST

 महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेती शास्वत शेती बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षात शेतीक्षेत्रांमधील गुंतवणूक तिपटीने वाढली आहे.

मुंबई -  महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेती शास्वत शेती बनवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून गेल्या तीन वर्षात शेतीक्षेत्रांमधील गुंतवणूक तिपटीने वाढली आहे. शेतीक्षेत्रात सुमारे 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीचे न्यूज 18 लोकमत असे रिलाँचिंग झाले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारच्या वाटचालीवर भाष्य करताना फडणवीस म्हणाले,"आम्ही शास्वत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. राज्यातील बहुतांश क्षेत्र अद्यापही कोरडवाहू आहे. तसेच शेती क्षेत्र हे मदत आणि पुनर्वसनाचे क्षेत्र नाही. त्यात गुंतवणूक व्हायला हवी. ही बाब आम्ही विचारात घेतली आहे. त्यामुळेच शेतीक्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. 2012-13 सालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती पाहिल्यास आज शेती क्षेत्रामध्ये सुमारे 67 हजार कोटींची गुंतवणूक झाली आहे. शेतीमधील गुंतवणूक ही जवळपास तिप्पटीने वाढली आहे.""महाराष्ट्रातील शेतीक्षेत्रामध्ये सकारात्मक वाढ झाली आहे. शेतीक्षेत्रात सुमारे 12.50 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. आकडेवारीत सांगायचे झाले तर शेतीक्षेत्रामधील उत्पन्न 40 हजार कोटींवर पोहोचली आहे. अधिकाधिक शेतीक्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी सिंचनाची सोय वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी एक लाख विहिरी, 50 हजार शेततळी बांधण्यात आली आहेत, शेतकऱ्यांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. तसेच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुमारे 12 लाख हेक्टर जमीन हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे."अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार