शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

मुलाखत- संगीत नाटक टिकवायचंच नाही, तर वैभवशाली करायचंय : चिन्मय मोघे ऊर्फ समर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 12:29 IST

नवी पिढी ही संगीत नाटकांकडे फारशी वळत नाही, असा सूर ज्येष्ठ कलाकारांकडून सातत्यानं आळविला जातो. मूळचा नाशिकचा व सध्या स. प. महाविद्यालयात शिकत असलेल्या अठरावर्षीय चिन्मय मोघे ऊर्फ समर यानं लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही भूमिकांद्वारे संगीत चंद्रप्रिया हे  नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणत हा समज खोटा ठरविला आहे.

ठळक मुद्देयेत्या २४ मार्च रोजी त्याच्या संगीत चंद्रप्रिया या नाटकाचा तिसरा प्रयोग पुण्यात

येत्या २४ मार्च रोजी त्याच्या संगीत चंद्रप्रिया या नाटकाचा तिसरा प्रयोग पुण्यात होत आहे. त्यानिमित्त त्याच्याशी साधलेला हा संवाद...- नम्रता फडणीस-  

* संगीत चंद्रप्रिया नाटकाचा विषय काय आहे? - हे नाटक चंद्रगुप्ताच्या प्रेमकथेवर आधारित आहे. भारताचा जेव्हा सुवर्णकाळ होता असं म्हटलं जातं, तेव्हा चंद्रगुप्तसारखे जे राज्यकर्ते होते त्यांनी स्त्रियांबाबत काय निर्णय घेतला? हा सुवर्णकाळ पुन्हा आणायचा असेल तर काय करायला हवं, हे सांगितलं आहे. मूळ प्रेमकथा असलेली ही कथा शेवटी स्त्रीवादाचा संदेश देते. चंद्रगुप्त आपल्या बायकोवर वक्रदृष्टी असलेल्या भावाला कसा मृत्युदंड देतो, या सस्पेन्सवर हे नाटक आधारित आहे. तीस ते चाळीस वर्षांनी शास्त्रीय संगीताचा आधार असलेलं संगीत नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आलं आहे. या नाटकात बारा नाट्यपदं आणि भावगीतांचा समावेश आहे. * नाट्यकृतीमधून स्त्रीवादाबद्दल संदेश का द्यावासा वाटला? - प्रत्येक लेखकाची ही जबाबदारी आहे, की त्याच्या कलाकृतीतून कोणता तरी संदेश दिला गेला पाहिजे. नुसत्याच कथेला काही उपयोग नाही. नाटक बघणारा जो वर्ग आहे. त्यांच्यापर्यंत कलाकृतीच्या माध्यमातून काहीतरी पोहोचविणे गरजेचं आहे. स्त्रियांच्या बाबतीत भीषण गोष्टी घडत आहेत. त्याबाबत काय उपाययोजना करायला हव्यात, हे माज्या हातात असलेल्या नाट्यकलेतून मी मांडलं आहे. कारण मला केवळ प्रेमकथा मांडायची नव्हती. * अनेक ऐतिहासिक कथा आहेत; मग हीच सत्यकथा का निवडलीस? - आपल्याकडे अनेक नाटके रामायण किंवा महाभारतावरच अधिक झाली. अगदीच संगीत मानापमानसारखी नाटकं दीडशे वर्षांपूवीर्चं चित्रण घडवतात. मध्यंतरीचा देखील कालखंड आहे; मात्र त्याची फारशी दखल घेतली गेलेली नाही. उदा: चंद्रगुप्तच्या काळात नक्की काय झालं? हे फारसं कुणालाच माहिती नाही. ते प्रकाशात आणावंसं वाटलं म्हणून ही सत्यकथा निवडली. * संगीत नाटकच का करावंसं वाटलं? - संगीत नाटकांना दीडशे वर्षांचा इतिहास आहे. इतकी वैभवशाली परंपरा केवळ काही कारणांमुळे अथवा महत्त्वाकांक्षेच्या अभावामुळे मागे पडल्याचं दिसलं. चाळीस ते पन्नास वर्षांचा कालखंड पाहिला तर नवनिर्मिती थांबल्याचं जाणवलं.मत्स्यगंधा किंवा कट्यार काळजात घुसली ही शेवटची संगीत नाटके ठरली. त्यानंतरची नाटकं ही लावणी किंवा नृत्यनाट्याच्या जवळ जाणारी होती. मूळ संगीत नाटकाच्या परंपरेला अनुसरून नाटकं लिहावीत असं वाटलं. नवीन नाट्यपद, कथा मांडाव्यात असा विचार आला. * तुला संगीताची कौटुंबिक पार्श्वभूमी लाभली आहे का? - नाही. चाळीस-पन्नास वेगवेगळ्या गटातील संगीत नाटकं पाहूनच शिकलो. रसिकांनी माझं नाटक पाहून प्रतिक्रिया द्यावी. * संगीत नाटकाच्या भवितव्याविषयी ज्येष्ठ कलाकारांकडून चिंता व्यक्त केली जाते? त्याविषयी तुझे मत काय?- मी मूळचा नाशिकचा आहे. वर्षभरापूर्वी नाटकासाठी पुण्यात आलो. पण मला नाटकांविषयीची महत्त्वाकांक्षा जाणवली नाही. केवळ हळहळ व्यक्त होत राहिली. आता पुन्हा संगीत नाटकं रंगभूमीवर येत आहेत. त्यामुळे नुसतीच हळहळ व्यक्त न करता त्याला प्रोत्साहन द्यायचीदेखील जबाबदारी आहे. महत्त्वाकांक्षा ठेवली तर परंपरा द्विगुणित होते. * आगामी लेखन कोणतं सुरू आहे? - सध्या पुढच्या नाटकाचं लेखन सुरू आहे. दुसरं गद्यनाटक वर्षाअखेर येईल.  प्रेमगंध या काल्पनिक कथेवर आधारित कादंबरीच्या लेखनाचं काम पूर्ण झालं आहे. महाकाव्य शिवप्रताप हा माझा ग्रंथ चार महिन्यांत पूर्ण होईल. हे मराठी भाषेतील पहिलं महाकाव्य असेल. --------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेTheatreनाटकmusicसंगीतinterviewमुलाखत