शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मुलाखत : मळलेल्या वाटेने जाणाऱ्या व्यक्तिमत्वांवर लिहिण्यात रस नाही : वीणा गवाणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 12:26 IST

‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाद्वारे साहित्यविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या सिद्धहस्त लेखिका म्हणजे वीणा गवाणकर. वीणाताईंसारख्या एका प्रतिभावंत लेखिकेची ३४ व्या स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी ‘लोकमत’ने साधलेला हा संवाद. 

ठळक मुद्दे३४ व्या स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

नम्रता फडणीस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : स्त्री साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल काय भावना आहे?- थोडं आश्चर्य वाटत आहे!  माझ्या लेखनाचे विषय हे कथा, कादंब-यांचे कधीच राहिलेले नाहीत. लेखनाचा एखादा अनपेक्षित मार्ग गवसतो, जो आपल्या आवडीचा असतो. त्या मार्गाने पुढे जात असताना कधीतरी तीस-चाळीस वर्षांनी त्याची दखल घेतली जाते. याचा आनंद आहे. अध्यक्षपद हा एक भाग झाला पण तसा वाचकांशी अनेक वर्षांपासून संबंध आहे.* ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकामुळे एक लेखिका म्हणून तुम्ही नावारूपाला आलात, या पुस्तकाच्या ४२ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. काही वर्षातच अर्धशतक पूर्ण होईल. या पुस्तकाला वाचकांनी इतका उदंड प्रतिसाद दिला, त्याच्या यशाचे गमक काय वाटते? - वाचक अजूनही स्वत:ला या पुस्तकाशी रिलेट करीत आहे  हेच या पुस्तकाच्या यशाचे गमक आहे. ’कावर््हर’ म्हणजे फक्त शेती नाही तर त्यामधील ज्या वृत्ती किंवा प्रवृत्ती आहेत त्या कालातीत आहे. जिदद, प्रामाणिकपणा, कष्ट घेण्याची तयारी, स्वत:चे ध्येय साध्य होण्यासाठी अविरत प्रयत्न, कधी स्वत:चे स्खलन होऊ न देणे ही मूल्ये त्यात दिसतात त्याच्याशी वाचक नकळतपणे रिलेट करतो. अत्यंत सामान्य परिस्थितीमधला माणूस जर हे करू शकतो तर आपण त्याच्यापेक्षा अधिक सुस्तीत आहोत. कुठेतरी त्यात यशाचा मार्ग दिसतो, म्हणून अजूनही वाचक स्वत:ला त्याच्याशी जोडू शकतात. या पुस्तकाचा काही अंश अभ्यासक्रमांमध्ये देखील समाविष्ट करण्यात आला आहे. * चरित्रलेखनाकडेच का वळावेसे वाटले? - मी मुळात वाचणारी आहे. माझे हिरो,हिरॉईंन्स मला कथा, कादंब-यांमध्ये दिसत नाहीत आणि कथा, कादंबºया लिहिण्याचा माझाही पिंडही नाही. जर   ही कादंबरी असती तर ती टिकली असती का? आज ४० वर्षांनंतरही कोणत असं पुस्तक आहे ज्याच्याशी वाचक स्वत:ला जोडून घेतात. चरित्र ही  सत्य घटनांवर आधारित आहे म्हणून वाचक  त्याच्याशी रिलेट होतात. आजही लोक इंटरनेटवर शोधून सत्यतेची पडताळणी करू शकतात. एखाद्याचे चरित्र आवडले तर ४०० ते ५०० पुस्तकांचे संदर्भग्रंथ वाचणे, त्याचा शोध घेणे यामागे नक्क्कीच मेहनत आहे.  ती व्यक्तिमत्व कशी होती? काय प्रयत्न केले? अडचणी कुठल्या आल्या? ती कशी टिकली? त्याचे वेगळेपण कुठले आहे त्या पार्श्वभूमीचा शोध घेणे. यासाठी अवांतर वाचन महत्वाचे आहे. माझा व्यक्ती समजून घेण्याकडे सातत्याने ओढा आहे.  *  मराठीमध्ये चरित्रात्मक लेखन प्रकार काहीसा दुर्लक्षित राहिलाय असे वाटते का?- नाही, मला असे वाटत नाही. साहित्यिकांवर अनेकजणांनी मराठीत लेखन केले आहे. मात्र त्यांच्यापेक्षा माझ्या लेखनात नक्कीच फरक आहे. मी केवळ चरित्र लिहित नाही तर माणसाने चौकटीबाहेर जाऊन काय विचार केलाय, नवीन विचार काय दिलाय. संपूर्ण मानवजातीचा काय स्तर उंचावलाय, हे जाणून घेण्याची मला ओढ आहे. मळलेल्या वाटेने जाणा-या लोकांमध्ये मला रस नाही, म्हणून राजकारण्यांवर कधी लिहिलेले नाही. राजकीय व्यक्तींकडूनच अनेक आॅफर्स आल्या आमच्यावर लिहा , मात्र नकार दिला. * तुम्ही स्त्री सहित्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहाता?- स्त्रिया मोकळेपणाने लिहायला लागल्या आहेत, ही चांगली गोष्ट आहे. एक व्यासंग घेऊन त्याच्यामधून लिहिण्याचा भाग निराळा. प्रतिभावंत किंवा सिद्धहस्त लेखक असाल तर प्रश्नच नाही. पण  काही मांडू इच्छिणाºया  स्त्रियांनी लिहित राहायला हवे.  परंतु ते लेखन छापण्याची घाई करू नये. कारण ते योग्यपद्धतीने एडिटिंग झालेले नसते. ते तसेच ठेवा आणि मग त्याच्याकडे ति-हाईत म्हणून पाहा. तीन महिने ते लेखन शेल्फवर राहिले पाहिजे. लेखकाला स्वत:चे लेखन आधी समजले पाहिजे त्याच्यावर आधी काहीतरी परिणाम झाला पाहिजे. *  महिलांविषयक लेखन करणाऱ्या किंवा रूढी परंपरेच्या चौकटीबाहेर मत मांडणाऱ्या महिलांवर ‘स्त्रीवादी’ किंवा ‘बंडखोर’ लेखिका अशी लेबल लावली जातात, त्याविषयी काय वाटते?- जुन्या काळात महिलांना काय वाटते हे पुरूषच लिहित होते. सगळ्या तिच्या भूमिका पुरूषांच्या तोंडी होत्या. ताराबाई शिंदे, मालती बेडेकर, विभावरी शिरूरकर या महिलांनी स्त्रियांचे भावविश्व मांडायला सुरूवात केली. आता स्त्रिया सहजीवन, लैगिंक भावना याबददल मोकळेपणाने लिहू लागल्या आहेत. स्त्रीवाद’ म्हणजे पुरूषविरोधात लेखन नव्हे. तर त्यांना काय वाटते हे त्यांच्याच शब्दातं मांडणे आहे. कुठलीही रूढ चौकट मोडली की ती बंडखोरच ठरवली जाते. * आगामी कोणते लेखन सुरू आहे? ते वाचकांच्या भेटीला कधी येणार?-  इस्त्राइलची महिला राष्ट्राध्यक्षा गोल्डा मेयर यांच्यावर लेखन सुरू आहे. ते लेखन अंतिम टप्प्यात आहे. दीड महिन्यात हे पुस्तक प्रकाशित होईल. 

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य