डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीस उद्यापासून सुरुवात

By Admin | Updated: March 22, 2016 03:35 IST2016-03-22T03:35:43+5:302016-03-22T03:35:43+5:30

मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्याप्रकरणी ‘माफीचा साक्षीदार’ असलेला अमेरिकेचा नागरिक डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीस २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

Interrogation of David Headley starts from tomorrow | डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीस उद्यापासून सुरुवात

डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीस उद्यापासून सुरुवात

मुंबई : मुंबईवरील हल्ल्याच्या खटल्याप्रकरणी ‘माफीचा साक्षीदार’ असलेला अमेरिकेचा नागरिक डेव्हिड हेडलीच्या उलटतपासणीस २३ मार्चपासून सुरुवात होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात त्याची विशेष सरकारी वकिलांनी सरतपासणी घेतली होती.
२६/११ हल्ल्याचा हँडलर आणि मुंबईत आलेल्या दहा अतिरेक्यांना हिंदी शिकवणारा व सूचना देणारा अबू जुंदाल याच्या खटल्यात हेडलीला साक्षीदार म्हणून बोलवले आहे. त्यामुळे जुंदालचे वकील आता हेडलीची उलटतपासणी घेणार आहेत. ही उलटतपासणी २३ मार्च ते २५ मार्चपर्यंत चालण्याची शक्यता आहे.
हेडलीच्या उलटतपासणीस २२ मार्चपासून सुरुवात होणार होती, परंतु त्याचे वकील आजारी पडल्याने त्याची उलटतपासणी पुढे ढकलण्यात आली.
भारतावर हल्ले करण्यासाठी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय पाकिस्तानातील सर्व दहशतवादी संघटनांना आर्थिक, लष्करी आणि नैतिक बळ
पुरवत असल्याचे हेडलीने सांगितले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Interrogation of David Headley starts from tomorrow