शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

International Yoga Day 2018 : विद्यार्थ्यांनी योगाभ्यास करायचा कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 2:40 AM

सध्या विद्यार्थी आपली नाराजी आणि व्यथा व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येतात.

मुंबई : सध्या विद्यार्थी आपली नाराजी आणि व्यथा व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसून येतात. त्याचाच एक भाग म्हणून वसतिगृहातील जीम, योग केंद्र, स्पोटर््स रुम बंद केल्याने आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली आहे. या ट्विटमध्ये त्यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाबा रामदेव तसेच श्री श्री रविशंकर यांना टॅग केले आहे.आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ होत असल्याची घटना नुकतीच समोर आली होती. त्यानंतर आता आयआयटीच्या वसतिगृहातील ही घटना समोर येत आहे. पवई येथील कॅम्पसमधील एका वसतिगृहातून जीम, योग केंद्र, स्पोर्टस रुम आणि इतर कार्यक्रमासाठी वापरले जाणारे विशेष केंद्र हद्दपार केल्याचे या ट्विटमधून समोर आले आहे. आज जागतिक योग दिन असून विद्यार्थ्यांकडून हक्काचे ठिकाणच हिरावून घेतले जाणार असेल, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर योग दिनाला कसा न्याय दिला जाणार, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होत आहे.वसतिगृहातील खोल्या वाढविण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले असले, तरी त्याचा फटका मात्र विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. मुख्य म्हणजे, सध्या वसतिगृहाचे नुतनीकरण सुरु असून या नुतनीकरणाचा कामांचा फटका वसतिगृहात राहत असलेल्या विद्यार्थ्यांना बसत असल्याची खंत ही या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.आयआयटी मुंबईत सध्या अनेक विभागाच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे. त्याबरोबरच कॅम्पसमधील अनेक वसतिगृहांचे नुतनीकरणाचे काम देखील हाती घेण्यात आले असून हॉस्टेल क्रमांक १४ मध्ये खोल्या वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. हे काम करताना या वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी असणारे योग केंद्र, जीम, कॉमन रुम, स्पोर्टस रुम तोडण्यात आली असल्याची माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात आली आहे.विद्यार्थ्यांसाठी नव्या खोल्या बांधण्यासाठी या केंद्राचा बळी दिला जात असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. या संदर्भात आयआयटीचे संचालक देवांग खाकर यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले आहे. मात्र, अद्याप यावर अजून कोणतीही कारवाई झाली नाही. तसेच या प्रश्नी संचालकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

टॅग्स :Yogaयोग