International Yoga Day 2018 : युवतींनी जलतरण तलावात केली वैविध्यपूर्ण आसने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 02:10 AM2018-06-21T02:10:08+5:302018-06-21T02:10:08+5:30

ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवन मुक्तासन अशा वैविध्यपूर्ण आणि तितक्याच कठीण अशा आसनांचे सादरीकरण पाण्यामध्ये करून योगप्रेमी युवतींनी सशक्त भारताचा संदेश दिला.

International Yoga Day 2018: Diverse busts made by women in the swimming pool | International Yoga Day 2018 : युवतींनी जलतरण तलावात केली वैविध्यपूर्ण आसने

International Yoga Day 2018 : युवतींनी जलतरण तलावात केली वैविध्यपूर्ण आसने

googlenewsNext

पुणे : ताडासन, नटराजासन, वीरभद्रासन, पतंगासन, पवन मुक्तासन अशा वैविध्यपूर्ण आणि तितक्याच कठीण अशा आसनांचे सादरीकरण पाण्यामध्ये करून योगप्रेमी युवतींनी सशक्त भारताचा संदेश दिला. शरीर सुदृढ असेल तर मन सुदृढ राहील आणि निरोगी समाजनिर्मिती होईल, असे सांगत पुण्यातील तब्बल १०० शालेय विद्यार्थ्यांनीदेखील तलावाबाहेर ही आसने घालून जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला.
श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे जागतिक योग दिनानिमित्त इन्स्टिट्यूट आॅफ योगा पुणे संस्थेतील युवतींनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातील नांदे तलावात योगासनांचे सादरीकरण केले. या वेळी उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, विनय मराठे, नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, नीलिमा खाडे, मानसी देशपांडे, अ‍ॅड. मिलिंद पवार, आनंद रेखी, आयोजक प्रा. डॉ. राजेंद्र खेडेकर, मनीषा खेडेकर, योगाचार्य विदुला शेंडे, विश्वास शेंडे, संगीता लकारे उपस्थित होते.
पुण्यातील १०० शालेय विद्यार्थ्यांनी देखील आसने घालून या वेळी योगदिन साजरा केला. केंद्रीय आयुष्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी फोनद्वारे उपस्थितांशी संवाद साधून उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. चैताली ठोंबरे, निधी घोरपडे, लौकिका माळगे, मनीषा कडिर्ले या युवतींनी पाण्यामध्ये योगासने सादर केली. प्रा. डॉ. राजेंद्र खेडेकर म्हणाले, ‘ताणतणाव आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात योग करणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थिदशेपासूनच योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि त्यांनी दैनंदिन जीवनात दररोज योगासने करावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. पाण्यामध्ये आसने करणे अवघड असते, हा प्रकार परदेशात प्रचलित आहे. पुण्यामध्ये हा प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला.
>डोक्यापासून ते पायापर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवाला योगासनांमुळे व्यायाम मिळतो. पाण्यामध्ये केलेला अ‍ॅक्वा योगा हा वेगळ्या प्रकारचा व्यायामप्रकार आहे. पाण्यातील लहरींशी झुंज देत ही योगासने केली जात असल्याने शरीराला अधिक व्यायाम मिळतो.
- विदुला शेंडे, योगाचार्य
>श्री ज्ञानयोग सेवा ट्रस्टतर्फे जागतिक योग दिनानिमित्त इन्स्टिट्यूट आॅफ योगा पुणे संस्थेतील युवतींनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातील नांदे तलावात योगासनांचे सादरीकरण केले. या वेळी (डावीकडून) चैताली ठोंबरे, निधी घोरपडे, लौकिका माळगे, मनीषा कडिर्ले.

Web Title: International Yoga Day 2018: Diverse busts made by women in the swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग