मुंबईतीस अंधेरी-मरोळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला प्रशासक्कीय मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.
यासंदर्भात सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नितेश राणे म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या सन २०२५-२६ च्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून, त्यामध्ये मुंबईतील मरोळ (अंधेरी) येथे १३८ कोटी रुपयांच्या आधुनिक घाऊक मासळी बाजार प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
मासेमारी असतानाच्या बंद कालावधीत पारंपरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील सुमारे २,८१६ लाभार्थ्यांना उपजीविका व पोषण सहाय्य देण्याचाही समावेश आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, याचे आज फलित झाल्याचे समाधान वाटते, असेही नितेश राणे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मुंबईसारख्या महानगरात आंतरराष्ट्रीय दर्जाचा घाऊक मासळी बाजार उभारणे ही काळाची गरज होती. या प्रकल्पामुळे केवळ व्यापार सुलभ होणार नाही, तर हजारो मासेमार व संबंधित घटकांना रोजगार आणि स्थैर्य मिळेल. महाराष्ट्रात ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ मजबूत करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा ठाम विश्वास वाटतो, असेही नितेश राणे यांनी सांगितले.
Web Summary : Mumbai's Andheri-Marol will house a ₹138 crore international-grade wholesale fish market. The project, approved under the PM Matsya Sampada Yojana, aims to boost the 'Blue Economy,' create jobs, and support fishermen during fishing bans. This initiative is a significant step towards strengthening Maharashtra's fisheries sector.
Web Summary : मुंबई के अंधेरी-मरोल में ₹138 करोड़ की लागत से अंतर्राष्ट्रीय स्तर का थोक मछली बाजार बनेगा। पीएम मत्स्य संपदा योजना के तहत स्वीकृत इस परियोजना का उद्देश्य 'ब्लू इकोनॉमी' को बढ़ावा देना, रोजगार सृजन करना और मछली पकड़ने पर प्रतिबंध के दौरान मछुआरों का समर्थन करना है। यह महाराष्ट्र के मत्स्य पालन क्षेत्र को मजबूत करने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है।