बाबासाहेबांच्या नावे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
By Admin | Updated: August 30, 2015 01:25 IST2015-08-30T01:25:18+5:302015-08-30T01:25:18+5:30
ज्यांच्या नावे विद्यापीठ आहे त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर जावे म्हणून विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्याची

बाबासाहेबांच्या नावे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
औरंगाबाद : ज्यांच्या नावे विद्यापीठ आहे त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर जावे म्हणून विद्यापीठाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी शनिवारी येथे दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक पार पडली. यामध्ये हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंबंधी डॉ. चोपडे यांनी सांगितले की, २५ लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि राज्यघटनेची प्रत, असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. विद्यापीठाच्या पुढील अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंतीनिमित्त या पुरस्काराची घोषणा होत आहे. डॉ. आंबेडकर यांचा सामाजिक विचार मांडणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येईल. (प्रतिनिधी)