शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

शिवसेनेतील अंतर्गत कलह उफाळला

By admin | Updated: August 26, 2016 06:54 IST

काँग्रेस नेत्याला शिवसेनेत प्रवेश दिल्याने वसई शिवसेनेतील अंतर्गत कलह उफाळून आला आहे.

शशी करपे,वसई : महानगरपालिकेच्या राखीव जागेत बनावट कागदपत्रे बनवून इमारत बांधल्याप्रकरणी काँग्रेसच्या नेत्याला तुुरुंगात टाकण्याचे काम करणाऱ्या उपजिल्हाप्रमुखाला शह देण्यासाठी त्याच्या काँग्रेस नेत्याला शिवसेनेत प्रवेश दिल्याने वसई शिवसेनेतील अंतर्गत कलह उफाळून आला आहे.नालासोपारा ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष टेंबवलकर ायंचा पालघर जिल्हा संपर्क प्रमुख अनंत तरे यांच्या हस्ते गुरुवारी शिवसेनेत प्रवेश करवण्यात आला .जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर यांच्याशी सल्लामसलत करून हे नाट्य घडवून आणले. तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली वसई-विरार महापालिका हद्दीतील गिळंकृत राखीव भुखंडांप्रकरणी भुमाफांविरोधात शिवसेनेने रणशिंग फुंकल्याचे नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. असे असताना ४२०,४६५,४६८,४७१, ४७४,३४ कलमाचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या संतोष टेंबवलकर यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आल्यामुळे तेंडोलकर यांच्या भुमिकेचे यावेळी काय झाले याची चर्चा केली जात आहे. विशेष म्हणजे टेंबवलकर यांच्याविरोधात शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा गटनेता धनंजय गावडे यांनीच कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला होता.प्रत्येक पक्षात गुन्हे दाखल असलेले नेते, कार्यकर्ते आहेत. टेंबवलकर यांच्यासाठी मुंबईतील वरिष्ठांकडून शब्द टाकण्यात आला होता. असे असले तरी अनधिकृत बांधकाम आणि भूमाफियांविरोधातील लढा चालूच राहिल, असे जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, गेलच आठवड्यात गावडे समर्थक विरार शहर उपप्रमुख अनधिकृत बांधकामांविरोधात तक्रारी करून पक्षाला बदनाम करीत असल्याचा ठपका ठेऊन जाधव यांच्या पदाला स्थगिती देण्यात आली होती. पक्षात अशापद्धतीने कोंडी होत असल्याने गावडे यांनी स्थायी समिती सदस्यपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर उपजिल्हाप्रमुख आणि गटनेते पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवून दिला आहे. त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. >अशी आहे विरोधकांची ‘गहरी चाल’टेंबवलकर यांनी कलेक्ट बोगस बिनशेती परवाना, महापालिकेची बोगस बांधकाम परवानगी व आर्किटेक्टचा बोगस प्लान आदी कागदपत्रांच्या आधारे इमारत उभारली होती. तसेच सदर इमारतीतील गाळे आणि सदनिकांची विक्री करून त्याने शासनाची आणि नागरिकांची घोर फसवणूक केल्यामुळे त्याचविरोधात वरिल गंभीर स्वरुपाचे गुन्हे झाले होते. त्यानंतर टेंबवलकर यांना अटक करण्यात येऊन २० दिवस तुरुंगात ठेवणत आले होते. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने केलेले हे प्रकरण संपुर्ण जिल्ह्यातच नव्हे तर मंत्रालयातही गाजले होते.>काय आहे राजकारणभूमाफियांविरोधात आपला लढा असताना टेंबवलकरला शिवसेनेत प्रवेश दिला जाऊ नये अशी भुमिका नगरसेवक आणि जिल्हा उपप्रमुख धनंज गावडे यांनी घेतली होती. पंचवीस लाख रुपयांची लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला नगररचना संचालक रेड्डी यांना पकडून देण.सहाय्यक आयुक्ता स्मिता भोईर यांचा भ्रष्टाचार आणि बोगस सीसी वापरून इमारती उभारणाऱ्या अनेक बिल्डरांचे पितळ उघड पाडल्यामुळे गावडे यांचे पक्षात आणि जिल्ह्याच राजकारणात चांगलेच वजन वाढले. त्यामुळे त्यांची कोंडी करण्यासाठी टेंबवलकर यांना शिवसेनेत प्रवेश देण्याचे राजकारण गावडे विरोधी गटाने केल्याचे बोलले जात आहे.