शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वस्ताईचा गुड ॲण्ड सिम्पल टॅक्स! जीएसटीचे ५% आणि १८% असे दोनच दर; विमा पॉलिसींना करसूट, सिमेंटवर १८% जीएसटी
2
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
3
अमिताभ बच्चन आणि क्रिती सनॉन यांच्यानंतर कार्तिक आर्यननंही अलिबागमध्ये खरेदी केली जमीन; किती कोटींना झाली डील?
4
श्रेयस, यशस्वी अन् शार्दुल... टीम इंडियाच्या स्टार त्रिकुटाच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
5
"मुंबईत कधी आपलेपणा वाटला नाही...", असं का म्हणाले मनोज वायपेयी? शहर सोडायचा आला विचार
6
GST Rate Cut: पहिले महिन्याला भरत होता ₹१७,७०० चा हेल्थ इन्शुरन्स प्रीमिअम, आता किती वाचतील; ३६ हजारांच्या टीव्हीवर किती बचत?
7
ये कैसी ‘फॉरेन पॉलिसी’, ये तो ‘फौरन पॉलिसी’ है, भैया!
8
सर्वसामान्यांना दिलासा देणारे GST चे नवीन दर कधी लागू होणार? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिले उत्तर
9
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
10
GST दरातील कपातीनंतर शेअर बाजार सुस्साट; Sensex ५४७ अंकांनी वधारला, या शेअर्समध्ये जोरदार तेजी
11
आंदोलनाचा व्यापाराला १०० कोटींचा फटका, रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचा दावा 
12
GSTबाबत सरकारकडून भेट, दैनंदिन वापरातील वस्तू कुठल्या स्लॅबमध्ये आल्या? पाहा संपूर्ण यादी
13
जीएसटीमध्ये नेमके काय बदल झाले? काय किती स्वस्त झाले? जाणून घ्या एका क्लिकवर...!
14
40 GST: 'या' लोकांच्या खिशावर पडणार ताण, कोणत्या वस्तुंवर ४० टक्के जीएसटी?
15
दसरा, दिवाळीत करा बंपर वस्तू खरेदी; जीएसटी लागणार कमी
16
आंदोलनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई कोण देणार? प्रतिज्ञापत्र सादर करा, उच्च न्यायालयाचे निर्देश
17
पाकिस्तानी क्रिकेटरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप, पोलिसांनी मैदानातून उचललं, कोर्टानेदिला निकाल
18
'संगीत देवबाभळी' फेम शुभांगी सदावर्तेचा घटस्फोट; पती पोस्ट करत म्हणाला, "काही वर्षांपूर्वीच..."
19
जीआर नव्हे, ही तर माहिती पुस्तिका, मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांची टीका
20
आता कंत्राटदारांच्या आत्महत्या; ‘लाडकी बहीण' सारख्या योजनांवर कोट्यवधी खर्च, थकबाकी भागवायला पैसा नाही!

ओबीसींमध्ये जीआरवरून तीव्र संताप, जीआरविरोधात कोर्टात जायची तयारी

By यदू जोशी | Updated: September 4, 2025 08:15 IST

मूळ ओबीसींच्या हक्कावर गदा येणार असल्याची भावना...

यदु जोशी -

मुंबई : मनोज जरांगे-पाटील यांच्या मागणीनुसार राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटिअरसंर्भात काढलेल्या जीआरवर ओबीसी संघटना व नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या जीआरमुळे मराठा समाजातील व्यक्तींना कुणबी म्हणजे ओबीसी प्रमाणपत्रे सहजपणे मिळतील व त्यामुळे मूळ ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल, असे ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे. या जीआरविरूद्ध कोर्टात जाण्याचीही तयारी सुरू झाली असून, ठिकठिकाणी आंदोलनेही सुरू झाली आहेत.  हैदराबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा-कुणबी वा कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबतचा शासन निर्णय सरकारने काढला. त्यानंतर जरांगे-पाटील यांनी मंगळवारी उपोषण मागे घेतले. मात्र, हा जीआर म्हणजे कुणबी/ओबीसींमध्ये मराठा समाजाची घुसखोरी असल्याची ओबीसी संघटनांची भावना आहे. ओबीसींच्या नाराजीवर उपसमितीचा उतारा    - सविस्तर वृत्त/६

मंत्रिमंडळ बैठकीवर भुजबळांचा बहिष्कारज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर टाकलेल्या अघोषित बहिष्काराची जोरदार चर्चा बुधवारी राजकीय वर्तुळात होती. बैठकीसाठी भुजबळ सह्याद्री अतिथीगृहावर गेले. अजित पवार गटाच्या प्री कॅबिनेट बैठकीला हजर राहिले, पण सर्व मंत्री मंत्रिमंडळ बैठकीसाठी जात असताना ते  बाहेर पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना कॉल केला पण भुजबळ परतून गेले नाहीत.

मराठा समाजाच्या लोकांना उचलून कुणबी/ओबीसीत टाकण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही. अशी कोणाची जात एका जीआरने बदलता येत नसते, आम्ही न्यायालयात जाऊ. जीआर काढण्यापूर्वी सरकारने हरकती का नाही मागविल्या? सरकार असा काही निर्णय घेईल ही अपेक्षा नव्हती. जीआरबद्दल अनेक शंका ओबीसी नेत्यांना आहेत. छगन भुजबळ, मंत्री तथा ज्येष्ठ ओबीसी नेते 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळOBCअन्य मागासवर्गीय जातीMaratha Reservationमराठा आरक्षण