शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
3
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
4
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
5
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
6
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
7
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
8
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
9
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
10
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
11
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
12
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
13
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
14
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
15
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
16
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
17
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
18
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
19
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस

आरोग्याच्या काळजीसाठी रक्तदाब वाढविणारे विमा हप्ते; सरकारी कर्मचाऱ्यांवर आर्थिक बोजा

By यदू जोशी | Updated: December 13, 2018 05:25 IST

५५ वर्षे वयावरील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या मेडिक्लेम योजनेतील विमा हप्ता दरात प्रचंड वाढ करून विमा कंपन्यांनी लूट चालविली आहे.

मुंबई : ५५ वर्षे वयावरील सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी वाहण्यासाठी राज्य शासनाने आणलेल्या मेडिक्लेम योजनेतील विमा हप्ता दरात प्रचंड वाढ करून विमा कंपन्यांनी लूट चालविली आहे. महिन्याकाठी ३७७५ रुपये प्रिमियम सेवानिवृत्तांना कसा परवडेल हा प्रश्न आहे. आरोग्याच्या काळजीसाठीचे हे दर कर्मचारी, अधिकाºयांचा रक्तदाब वाढविणारे ठरले आहेत.९ जुलै २०१४ रोजी राज्य शासनाने ही योजना पहिल्यांदा आणली. त्यात पती, पत्नी अशा दोघांनाही लाभ देण्यात आला. त्यावेळी पाच लाख रुपयांच्या मेडिक्लेम कव्हरसाठी अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्य शासकीय अधिकाºयांसाठी (गट अ) वार्षिक विमा हप्ता हा ९ हजार ४०० रुपये, १० लाख रुपयांसाठी १३ हजार ५०० रुपये तर २० लाख रुपयांसाठी २० हजार ८०० रुपये इतका होता. गट ब मधील अधिकाºयांसाठी ३ लाख रुपयांच्या मेडिक्लेम कव्हरसाठी ७८०० रुपये, ४ लाखासाठी ८६०० तर ५ लाख रुपयांसाठी ९४०० रुपयांचा वार्षिक विमा हप्ता होता. क वर्ग कर्मचाºयांकरता १ लाख रुपयांसाठी ६ हजार रुपये, २ लाख रुपयांसाठी ६९०० रुपये तर ३ लाखाच्या कव्हरसाठी ७ हजार ८०० रुपये वार्षिक विमा हप्ता होता. जेवढ्या रकमेची मेडिक्लेम पॉलिसी आहे, त्याच्या ७० टक्के रक्कम ही उपचारासाठी दिली जाते. योजनेची जबाबदारी दोन विमा कंपन्यांवर टाकण्यात आली आहे, त्यात न्यू इंडिया एन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचा समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांनी विमा हप्त्याचे दर वाढवून कर्मचाºयांवर मोठा आर्थिक बोजा टाकला आहे.अव्वाच्या सव्वा हप्ता; मात्र केवळ उपचारांसाठी मिळतो खर्च२० लाख रुपयांच्या मेडिक्लेम कव्हरसाठी तब्बल ७५ हजार ८२६ रुपये मोजावे लागणार आहेत. १० लाख रुपयांसाठी ३९,६११ रुपये, ५ लाख रुपयांसाठी २१,८१५ रुपये, ३ लाख आणि ४ लाख रुपयांसाठी १८,१०२ रुपये, २ लाख रुपयांसाठी १३,९८२ रुपये तर एक लाख रुपयांसाठी ११ हजार ७ रुपये असे सुधारित दर लागू करण्यात आले आहेत. कर्मचारी जो हप्ता भरतात ती रक्कम त्यांना कधीही परत मिळत नाही. केवळ उपचारासाठीचा खर्च त्यांना मिळतो.

टॅग्स :Healthआरोग्य