शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

कोळशाचा साठा अपुरा; पुन्हा वीजटंचाईचे ढग

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 12:27 IST

coal : कोळसा आयात केल्यानंतरही राज्यातील सातपैकी तीन औष्णिक वीज केंद्रातील कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत आहे.

- कमल शर्मा

नागपूर : औष्णिक वीज केंद्रात कोळसा तुटवड्यामुळे महाराष्ट्रात एप्रिल-मेमध्ये भारनियमन करावे लागले. राज्यात सध्या तशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. मान्सून सक्रिय झाला असून, औष्णिक वीज केंद्रामध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध नाही. कोळसा आयात केल्यानंतरही राज्यातील सातपैकी तीन औष्णिक वीज केंद्रातील कोळशाचा साठा संवेदनशील स्थितीत आहे.

अशा परिस्थितीत मान्सूननंतर विजेची मागणी वाढली तर ती पूर्ण करणे कठीण जाईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पावसाळ्यात अनेक कोळसा खाणींमध्ये पाणी जमा होते. कोळशाची वाहतूकही कठीण होऊन जाते. त्यामुळे वीज केंद्रामध्ये पावसाळा लागण्यापूर्वीच कोळशाचा जास्तीत जास्त साठा वाढवणे आवश्यक असते. महाजेनको मान्सूनपूर्वी किमान १५ दिवस व त्यापेक्षा अधिकचा साठा तयार करीत असतो.

यावर्षी पहिल्या सहा वर्षात कोळशाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इंडोनेशिया येथून २० लाख मेट्रिक टन कोळसा आयात केला जात आहे. परंतु यानंतरही वीज केंद्रांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध होऊ शकलेला नाही. कोराडी (६६० मेगावॉट) वीज केंद्रात ३.५७ दिवस, भुसावळ  ५.११ दिवस व परळी येथे ६.२० दिवस पुरेल इतकाच साठा उपलब्ध आहे. वीज केंद्रात ७ दिवसांपेक्षा कमी कोळशाचा साठा असेल तर त्याला संवेदनशील मानले जाते. त्यामुळे राज्यातील नव्या सरकारसमोर वीज संकटाचे आव्हान उभे ठाकले आहे. 

औष्णिक वीज केंद्रातील स्थिती वीज केंद्र   - साठा (दिवसांचा)कोराडी (६६०) - ३.५७ कोराडी (२१०) - १०.०७ नाशिक - १३.२३भुसावळ - ५.११ परळी - ६.२० पारस - १२.२३चंद्रपूर - ९.०३ खापरखेडा - ९.४३

महाजेनकोला परिस्थिती आटोक्यात आणण्याचा विश्वास यासंदर्भात महाजेनकोचे अधिकारी उघडपणे काही बोलायला तयार नाही. परंतु नाव न छापण्याच्या अटीवर कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याची बाब ते मान्य करीत आहेत. आयात होणाऱ्या कोळशाच्या भरवशावर ही परिस्थिती आटोक्यात आणू, असा विश्वासही अधिकाऱ्यांना आहे.

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटelectricityवीजPower ShutdownभारनियमनMaharashtraमहाराष्ट्र