शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 12:45 IST

नया नगरमध्ये जे मराठीत बोलत नाही त्यांना मराठी बोलायला शिकवा, गरीब हिंदू समाजातील लोकांना मराठीवरून का मारता असा सवाल  नितेश राणे यांनी केला.

मुंबई - महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मांडली. त्यावर मीरारोडच्या सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी समाचार घेतला. तुम्ही हिंदी सक्ती करून दाखवाच, आम्ही दुकाने काय शाळाही बंद करू असं राज यांनी म्हटलं. राज ठाकरे यांच्या या विधानावरून मंत्री नितेश राणे यांनी पलटवार केला आहे.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा. तिथे दहशतवादी घडवण्याचं काम होते. बुलढाण्यात एका मदरशात यमनचे नागरिक सापडले. असंख्य मदरशांमध्ये जिलेटिन काड्या सापडतात, तलवारी सापडतात. मग हिंदू समाजात भांडणे लावण्यापेक्षा आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका असं आव्हान त्यांनी दिले. 

तसेच हिंदी सक्तीचा निर्णय कुणी घेतला, जीआर कुणी मागे घेतला हे राज ठाकरेंनी समजून घेतले तर त्यातील व्हिलन कोण, शकुनी मामा कोण हे कळेल. मराठी मेळाव्यात ज्याच्यासोबत तुम्ही हातात हात घातला तोच खरा हिंदी सक्तीचा शकुनीमामा आहे. आज सामनामध्ये राज ठाकरेंच्या सभेची बातमी आहे का, माझा भाऊ सुरू आहे. बंधू प्रेम आहे मग आज बातमी का नाही..त्यामुळे खरा शकुनीमामा कोण तो मातोश्रीवर बसलेला आहे. हिंदी सक्तीविरोधात मोर्चे काढायचे असतील तर त्याला जबाबदार धरा असं सांगत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. 

दरम्यान, नया नगरमध्ये जे मराठीत बोलत नाही त्यांना मराठी बोलायला शिकवा, गरीब हिंदू समाजातील लोकांना मराठीवरून का मारता असा सवाल  नितेश राणे यांनी केला. त्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही जोरदार पलटवार केला. संजय भिसे, श्रीधर नाईक, रमेश गोवेकर हे हिंदू होते की नव्हते त्यावर नितेश राणेंनी उत्तर द्यावीत त्यानंतर आमच्यावर आरोप करावेत असं देशपांडे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेhindiहिंदीmarathiमराठी