शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Inspirational Story: घामाचे मोती! हमाली करणारा ज्ञानेश्वर बनला फौजदार; गावकऱ्यांनी घोड्यावर बसवून काढली मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 10:14 IST

ज्ञानेश्वरचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले, तर पदवीपर्यंतचे शिक्षण बलभीम महाविद्यालयात झाले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने  ज्ञानेश्वरने एका कृषी दुकानावर काम केले. दुसऱ्याच्या शेतात मिळेल ते काम करून मजुरी केली.

- सोमनाथ  खताळलोकमत न्यूज नेटवर्क बीड : घरी केवळ साडेतीन एकर जमीन. आई-वडील, भाऊ, बहीण असा परिवार. आई-वडील अडाणी. मजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. अशा परिस्थितीत आई-वडिलांच्या सोबत दुसऱ्याच्या शेतात मजुरी केली. कृषी केंद्रावर खताचे पोते उचलत हमाली करून शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीचा सामना करून जिद्द आणि चिकाटीच्या बळावर घामाचे मोती करत बीड तालुक्यातील शिदोड येथील ज्ञानेश्वर देवकते पोलीस उपनिरीक्षक बनला आहे. हे समजताच ग्रामस्थांनी ज्ञानेश्वरची घोड्यावर बसवून गावभर वाजतगाजत मिरवणूक काढली.   

ज्ञानेश्वरचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले, तर पदवीपर्यंतचे शिक्षण बलभीम महाविद्यालयात झाले. घरची परिस्थिती गरिबीची असल्याने  ज्ञानेश्वरने एका कृषी दुकानावर काम केले. दुसऱ्याच्या शेतात मिळेल ते काम करून मजुरी केली. त्यातून मिळालेल्या पैशातूनच त्याने शिक्षण पूर्ण केले. दिवसरात्र अभ्यास करून त्याने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्याने २४८ गुण मिळवले. तो आता फौजदार होणार असल्याने कुटुंबासह ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.    

सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत अभ्यासज्ञानेश्वर २०१८ पासून दररोज सकाळी १० ला बीडला आल्यावर रात्री ९ वाजताच परत गावी जायचा. दिवसभर अभ्यासिकेत बसायचा. रात्री घरी गेल्यावर आणि सकाळी उठल्यावरही हाती पुस्तक असायचे. शारीरिक चाचणीसाठीही सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळा तो सराव करत असे.   

दोन गुणांनी हुकली होती संधीअभ्यासात हुशार असणारा ज्ञानेश्वर शारीरिक चाचणीत थोडा कमी पडला होता. धावण्यात मायक्रो ७५ सेकंद कमी पडल्याने त्याचे सहा गुण कमी आले. याचा परिणाम मुख्य गुणांवर झाला. गुणांकनामध्ये त्याला अवघे दोन गुण कमी पडल्याने त्याचे यापूर्वी एकदा फौजदार होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले होते. यातून धडा घेत त्याने धावण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. तेव्हापासून यशासाठी धावलेला ज्ञानेश्वर पीएसआय बनूनच थांबला.

खाकी वर्दी अंगावर असावी, हे सुरुवातीपासूनच स्वप्न होते. आज माझे स्वप्न पूर्ण होतेय. आई-वडील, नातेवाईक आणि विशेष म्हणजे मित्रांनी केलेल्या सहकार्यामुळेच मी ‘स्टार’ झालो.- ज्ञानेश्वर देवकते

टॅग्स :PoliceपोलिसInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी