दिग्गजांनी रंगविला प्रेरणादायी सोहळा
By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:47+5:302016-04-03T03:52:47+5:30
राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यापार, साहित्य, कला अशा अनेकविध क्षेत्रांतील अग्रगण्य व्यक्तींनी फुललेल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट (एनसीपीए)च्या प्रशस्त सभागृहात

दिग्गजांनी रंगविला प्रेरणादायी सोहळा
मुंबई : राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यापार, साहित्य, कला अशा अनेकविध क्षेत्रांतील अग्रगण्य व्यक्तींनी फुललेल्या नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट (एनसीपीए)च्या प्रशस्त सभागृहात शुक्रवारी सायंकाळी ‘लोकमत’चा ‘महाराष्ट्रीयन आॅफ द इयर’ पुरस्कार सोहळा दिमाखात साजरा झाला. आमीर खान व रणवीर सिंग यांची अदाकारी... आशातार्इंच्या मोठेपणाला साजेसं व्यक्त झालेलं मार्दव... उद्योजिका नीता अंबानी यांच्या दातृत्वावर पडलेला प्रकाशझोत, तर कर्करोगग्रस्तांवरील उपचारांचे असिधाराव्रत घेतलेल्या डॉ. राजेंद्र बडवे अशा दिग्गजांचा सन्मान होत असताना सभागृहात टाळ्यांच्या तालावरील जल्लोषाच्या लाटा उसळल्या.
अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ पुरस्कृत आणि धूत ट्रान्समिशन प्रस्तुत लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांची मांदियाळीच एनसीपीएच्या सभागृहात जमली होती. कला, क्रीडा, चित्रपट, रंगभूमी, विज्ञान, तंत्रज्ञान, बिझनेस, इन्फ्रास्ट्रक्चर, समाजकारण, राजकारण, प्रशासन अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व अभिनेता आमीर खान यांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. उद्योजिका नीता अंबानी यांना महाराष्ट्र युथ आयकॉन आॅफ द इयर तर गानसम्राज्ञी आशा भोसले यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.
अजून मला महाराष्ट्र गौरव मिळालेला नाही, मात्र लोकमत समूहाने दिलेला पुरस्कार सर्वांत मोठा आहे, अशी भावना आशा भोसले यांनी या वेळी व्यक्त केली. कर्करुग्णांसाठी झटणारे ‘टाटा कॅन्सर रुग्णालया’चे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांना ‘लोकमत मानबिंदू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, अभिनेता रणवीर सिंग यास ‘लोकमत अभिमान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार विजेत्यांची नावे -
लोकसेवा , समाजसेवा : रज्जाक जब्बारखान पठाण
विज्ञान तंत्रज्ञान : प्रा. दीपक फाटक (आयटी तज्ञ)
परफॉरिमंग आर्ट : शंकर महादेवन
कला : शशिकांत धोत्रे, पेन्सील स्केच
क्र ीडा : ललिता बाबर (धावपटू)
रंगभूमी : मुक्ता बर्वे (छापाकाटा)
चित्रपट (स्त्री) : अमृता सुभाष (किल्ला)
चित्रपट (पुरु ष) : नाना पाटेकर (नटसम्राट)
इन्फ्रास्ट्रक्चर : सतीश मगर
बिझनेस : डॉ आनंद देशपांडे
प्रशासन - विभागीय : संदीप पाटील, (जिल्हा पोलीस अधीक्षक, गडचिरोली)
प्रशासन - राज्यस्तर : अजोय मेहता, मुंबई महापालिका आयुक्त
राजकारण / कोणाकडून आहेत अपेक्षा? : खासदार राजीव सातव - काँग्रेस - मराठवाडा
राजकारण / प्रभावी राजकारणी कोण? : नितीन गडकरी - भाजपा - विदर्भ
समाजशिक्षणाचेच काम
लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर या पुरस्कारसोहळ्यामधील अजिंक्य डी. वाय. पाटील विद्यापीठाचा सहभाग आमच्या विचारपरंपरेला आणखी पुढे नेणारा ठरला आहे. महाराष्ट्रीयन या शब्दाची नवी व्याख्याच यानिमित्ताने झाली आहे. रणवीर सिंग असो की आमीर खान हे तुमच्या-माझ्याइतकेच पक्के महाराष्ट्रीयन आहेत. महाराष्ट्र माहेर आहे असे अभिमानाने सांगणाऱ्या नीता अंबानी महाराष्ट्राचे ऋण मानतात आणि महाराष्ट्र त्यांना युथ आयकॉन मानतो, हे संकुचितपणाच्या सगळ्या भिंती तोडणारे आहे. अखिल महाराष्ट्राचे चित्र या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उभे राहिले. समाजशिक्षणाचेच काम या पुरस्कार सोहळ्यातून झाले आहे.
- अजिंंक्य डी. वाय. पाटील,
अध्यक्ष : अजिंक्य डी.
वाय. पाटील विद्यापीठ