शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारमधील फोन टॅपिंगची चौकशी, पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती देणार अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 11:22 IST

विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०१६-१७ या काळात ते खासदार असताना राज्यात त्यांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती.

मुंबई :  देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या पाच वर्षांच्या काळात झालेल्या फोन टॅपिंगची राज्याच्या पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्यात येणार आहे. गृहविभागाने त्याबाबतचा आदेश शुक्रवारी काढला.विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०१६-१७ या काळात ते खासदार असताना राज्यात त्यांचे फोन टॅप केले जात होते, असा आरोप करून उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यावर सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते. प्रत्यक्षात आज काढलेल्या आदेशात २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या फोन टॅपिंग प्रकरणांची चौकशी केली जाईल. तसेच, या कालावधीत अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैरपद्धतीने टॅप करण्यात आले होते का याचा तपास केला जाईल व तसे आढळल्यास संबंधितावर जबाबदारी निश्चित केली जाईल, असे म्हटले आहे.पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखालील समिती तीन महिन्यांच्या आत अहवाल सादर करेल. समितीमध्ये आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त (विशेष शाखा), मुंबई हे सदस्य असतील. विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात याबाबतची सर्व वस्तुस्थिती मांडली जाईल, असेही गृह विभागाच्या आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाDilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेस