मनसेच्या तक्रारीवर चौकशी सुरू
By Admin | Updated: April 1, 2015 03:04 IST2015-04-01T03:04:54+5:302015-04-01T03:04:54+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापौर स्नेहल आंबेकर यांच्याविरोधात केलेल्या घोटाळ््यांच्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे.

मनसेच्या तक्रारीवर चौकशी सुरू
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महापौर स्नेहल आंबेकर यांच्याविरोधात केलेल्या घोटाळ््यांच्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सुरू केली आहे. महापालिकेतील मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौरांसोबत मोबाइल फोनवर झालेल्या संभाषणाची रेकॉर्डेड सीडी आज एसीबीकडे सोपवली. उद्या, बुधवारी देशपांडे व अन्य तक्रारदार नगरसेवक संतोष धुरी यांचे जबाब एसीबी नोंदवून घेणार आहे.
विकासनिधीत घोटाळा केल्याचा गंभीर आरोप देशपांडे व धुरी यांनी केला आहे. याबाबत एसीबीकडे महापौरांची चौकशी करण्याची मागणी स्वतंत्र तक्रारींद्वारे या दोघांनी केली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार या दोन तक्रारदारांना उद्या चौकशीसाठी वरळी येथील मुख्यालयात बोलावण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशपांडे आज एसीबीच्या वरळी येथील मुख्यालयात उपस्थित होते. निधीवाटपाबाबत महापौरांशी फोनवरून झालेल्या आक्षेपार्ह संभाषणाची सीडी त्यांनी एसीबीच्या संबंधित अधिकाऱ्यांना पुरावा म्हणून सादर केली.