शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

विदर्भात होणार ‘इनलॅण्ड रिफायनरी’- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 5:18 AM

नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले.

नागपूर : नाणारमध्ये कोस्टल आॅईल रिफायनरीला होत असलेल्या विरोधातच विदर्भात ‘इनलॅण्ड आॅईल रिफायनरी’ उभारण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवरी विधानसभेत दिले. त्यांनी सांगितले की, ते या संदर्भात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना विनंती करून ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यत पोहोचवतील.भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी नाणारमध्ये कोस्टल रिफायनरीला होत असलेला विरोध पाहता ही रिफायनरी विदर्भात स्थापित करण्याची मागणी केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘त्यांना माहीत आहे नाणारमध्ये प्रस्तावित रिफायनरी ही कोस्टल (समुद्र तट) आहे, आणि समुद्राला विदर्भात आणता येऊ शकत नाही. परंतु रिफयनरी मात्र निश्चित स्थापित होऊ शकते. यामुळे ५० हजार लोकांना प्रत्यक्ष व १ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. देशाला ‘आॅईल सिक्युरिटी’ देण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरेल.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी नाणारमध्ये रिफायनरी येणार की नाही, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना केला. परंतु मुख्यमंत्र्यांनी विदर्भात रिफायनरी आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगत नाणारबाबतचे उत्तर देण्याचेटाळले.>विजय दर्डा यांनी केली होती सूचनालोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी सदस्य विजय दर्डा यांनी ५ एप्रिल २०१८ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सुचविले होते की, नाणार येथील लोक रिफायनरीला विरोध करीत आहेत, तर तो प्रकल्प विदर्भात आणता येऊ शकतो. आपल्या सूचनेच्या समर्थनार्थ दर्डा यांनी असे केल्यास होणारे फायदेही सांगितले होते. ते असे -१) रिफायनरीमुळे ३० हजार लोकांना प्रत्यक्ष आणि एक लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल.२) कच्च्या तेलाच्या वाहतुकीसाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या समानांतर पाईपलाईन टाकून प्रतिवर्ष ४८ हजार कोटी रुपयाची बचत केली जाऊ शकते.३) विदर्भातील रिफायनरीला रायपूर, जबलपूर आणि नागपूरच्या विमानतळाशी पाईपलाईनने जोडून माफक दरात एटीएफचा पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे विमान वाहतूक उद्योग आणि पर्यटनाला गती मिळेल. दर्डा यांनी असेही सुचविले होते की, जर नाणार रिफायनरीला काही कारणास्तव विदर्भात आणणे शक्य झाले नाही तर विदर्भ परिसरात एक नवीन ग्रीनफिल्ड रिफायनरी स्थापित केली जावी. भारतात कच्च्या तेलाचे शुद्धीकरण (रिफाईन)करण्याची सध्याची क्षमता २४० मिलियन टन इतकी आहे. ती २०३० पर्यंत ४४० मिलियन टनापर्यंत पोहोचवावी लागेल. त्यामुळे नवीन रिफायनरींची गरज पडणार आहे आणि त्यापैकी एक विदर्भात स्थापित केली जावी. दर्डा यांच्या पत्राच्या सुमारे १८ दिवसानंतर शिवसेनेने नाणार रिफायनरीला विरोध सुरू केला. २३ एप्रिल रोजी शिवसेनेचे कार्यकरी अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दर्डा यांच्या विचारांचे समर्थन करीत नाणार रिफायनरीला विदर्भात घेऊन जाण्याचा सल्ला दिला.>देवेंद्र, धर्मेंद्र आणि नरेंद्रसभागृहात त्यावेळी सर्वांनाच हसू आले जेव्हा आशिष देशमुख यांनी ‘ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यामार्फत ही मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवावी’ अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर देत म्हटले की ‘ मी (देवेंद्र) रिफायनरी स्थापित करण्याची विनंती धर्मेंद्र प्रधान यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवेल.

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८