कोविडच्या लसीची सुरक्षा, कार्यक्षमतेची माहिती द्या; उच्च न्यायालयात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2021 02:36 AM2021-01-17T02:36:13+5:302021-01-17T07:12:58+5:30

आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली. घटनेने अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या मूलभूत अधिकाराअंतर्गत माहिती जाणून घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रारही गोखले यांनी केली.

Inform the safety, efficacy of covid vaccine; Petition in the High Court | कोविडच्या लसीची सुरक्षा, कार्यक्षमतेची माहिती द्या; उच्च न्यायालयात याचिका

कोविडच्या लसीची सुरक्षा, कार्यक्षमतेची माहिती द्या; उच्च न्यायालयात याचिका

Next


मुंबई :  सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक इंटरनॅशनलने ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीजीसीआय)कडे कोविडच्या लसीची कार्यक्षमता व सुरक्षिततेविषयी माहिती सादर केली, ती माहिती सादर करण्याचे निर्देश डीजीसीआयला द्यावे, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते साकेत गोखले यांनी ही याचिका दाखल केली. घटनेने अनुच्छेद २१ अंतर्गत बहाल केलेल्या मूलभूत अधिकाराअंतर्गत माहिती जाणून घेण्याच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यात आल्याची तक्रारही गोखले यांनी केली. लसीच्या सुरक्षिततेविषयी व कार्यक्षमतेविषयी सादर केलेली माहिती मिळावी, यासाठी डीसीजीआयकडे माहितीच्या अधिकारांतर्गत त्यांनी  माहिती मागितली. ती जीवनाशी संबंधित असल्याने ४८ तासांत देणे आवश्यक आहे, असे त्यांनी याचिकेत नमूद केले. 

‘संमती द्यावी की नाही, याबाबत संभ्रम’
लसीकरणाचा पहिला टप्पा सुरू झाल्याने ही माहिती लवकर मिळावी. या लसींच्या मानवी चाचणीबाबतची माहिती सार्वजनिक केली नाही. त्यामुळे लस घेण्यास संमती द्यावी की नाही, असा प्रश्न आहे. लसीचे परिणाम माहीत नसल्याने संभ्रम आहे. या लसींची माहिती देण्याचे निर्देश डीसीजीआयला देण्याची विनंती गोखले यांनी केली आहे.

 

 

Web Title: Inform the safety, efficacy of covid vaccine; Petition in the High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.