शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कोरोना पाठोपाठ टोमॅटो पिकावरही परदेशी विषाणुजन्य रोगाचे संक्रमण; शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 19:14 IST

मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या या रोगाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

ठळक मुद्देटोमॅटोवरती स्पॉटेड विल्टव्हायरस, तिरंगा, बोकडय़ा, पिवळा लिफकर्ल, मोझँक हे विषाणुजन्य रोगराज्यात पुणे सोलापूर, सातारा,नाशिक, नगर या भागात सुमारे चार हजार हेक्टरवर टोमॅटोचे पीक लॉकडाऊन कालावधीत हा प्रसार झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण

सतीश सांगळे कळस : राज्यात कोरोना संसर्ग फैलावामुळे शेती अडचणीत आली  असतानाच टोमॅटो पिकावर परदेशी विषाणूजन्य रोगाचे संक्रमण झाल्याने  पीकच नेस्तनाबूत होण्याची भीती व्यक्त होत आहे .मात्र , सदर रोगाचे निदान व उपाययोजना करण्यास विलंब केला जात असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे .

राज्यात पुणे सोलापूर, सातारा,नाशिक, नगर या भागात सुमारे चार हजार हेक्टरवर टोमॅटोचे पीक घेतले जाते. राज्यात टोमॅटो हे महत्त्वाचे नगदी पीक आहे. कमी कालावधीचे हे पीक घेतले जाते .मात्र, विषाणूजन्य रोगामुळे अडचणीत आले आहे. टोमॅटोवर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होवुन त्याचा रंग बदलुन हे फळ सडत आहे. झाडावर रोग दिसत नाही. मात्र फळ वाकडे तिकडे होत आहे. हा रोग पहिल्यांदाच आला आहे.टोमॅटोवरती स्पॉटेड विल्टव्हायरस, तिरंगा, बोकडय़ा, पिवळा लिफकर्ल, मोझँक हे विषाणुजन्य रोग येतात. मात्र हा विषाणू वेगळ्या स्वरुपाचा आहे. लाल व रसरशीत असलेल्या टोमॅटोला विषाणूची बाधा झाली आहे. त्यामुळे फळे सडत आहेत त्यावर रासायनिक औषधांची फवारणी करुनही  फायदा होत नाही.मागील काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या या रोगाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या रोगाने थैमान घातल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे. या रोगावर कोणताही उपाय चालत नसल्याने शेतकऱ्याला एकरी दोन लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. तालुक्यातील शेळगाव, कडबनवाडी, लासुर्णे, निमगाव केतकी, रामकुंड अंथुर्णे ,भरणेवाडी, बोरी, काझड,शिंदेवाडी,परिसरात टोमॅटोचे पीक घेण्यात येते. टोमॅटोच्या रोपापासून, ते मल्चिंग पेपरवरील लागवड, झाडांना आधार देण्यासाठी तार-काठी, लागवडीची मजुरी यावर शेतकऱ्यांनी १ लाख रुपयांच्या वर खर्च केला आहे. मात्र, मागील काही दिवसांपासून रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे .या रोगावर कोणत्याही प्रकारच्या फवारणीचा उपयोग होत नाही. ढगाळ वातावरणामुळे रोग वाढत आहे .त्यामध्ये लाँकडाऊन कालावधीत हा प्रसार झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे .टोमॅटो पिकाची लागवड तीन हंगामात केली जाते .खरीप हंगामासाठी जून, रब्बी हंगामासाठी सप्टेंबर आणि उन्हाळी हंगामासाठी डिसेंबर या महिन्यात लागवड होते, मात्र तालुक्यात मार्च महिन्यात टोमॅटो लागवडीवर अधिक भर दिला जातो. या टोमॅटोला चांगला दर मिळतो असा शेतकऱ्यांचा मानस आहे. मात्र, आता लागवड केलेल्या टोमॅटोला चांगले दर मिळतील,  अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र , ती फोल ठरली आहे..............................

शेळगाव, कडबनवाडी या परिसरात टोमॅटोचे सुमारे १० प्लाँट आहेत. मात्र विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यामुळे फळाचा आकार, रंग बदलून फड वाया गेला आहे .माझे दोन एकर क्षेत्रातील पिक वाया गेले आहे. दोन लाख रुपयांपर्यंत खर्च केला आहे .मात्र , विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने अडचणीत वाढ झाली आहे. कृषी विभागाने पाहणी करून उपाययोजना करण्याची गरज आहे .सुनिल शिंगाडे, उत्पादक, शेतकरी ------------------------------------

तालुक्यात साधारणपणे २०० हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिक असते आहे .यामध्येच टोमॅटो पिक येते. मात्र , उन्हाळ्यात क्षेत्र कमी असते. टोमॅटो पिकांचा विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने नुकसान झालेल्या टॉमेटो पिकाच्या क्षेत्राची माहिती कृषी सहाय्यकांकडुन मागवली आहे. मात्र, या विषाणुचे निदान कृषी शास्त्रज्ञ करीत आहेत .

- सुर्यभान जाधव, तालुका कृषी अधिकारी इंदापुर.

टॅग्स :IndapurइंदापूरFarmerशेतकरी