दुष्काळग्रस्तांसाठी उद्योजक संजय घोडावत यांनी दिले ५१ लाख
By Admin | Updated: September 19, 2015 03:11 IST2015-09-19T03:11:34+5:302015-09-19T03:11:34+5:30
‘लोकमत’ने केलेल्या आवाहनास तत्काळ प्रतिसाद देत उद्योजक संजय घोडावत यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५१ लाख रुपयांचा निधी दिला.

दुष्काळग्रस्तांसाठी उद्योजक संजय घोडावत यांनी दिले ५१ लाख
मुंबई : ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनास तत्काळ प्रतिसाद देत उद्योजक संजय घोडावत यांनी मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांसाठी ५१ लाख रुपयांचा निधी दिला. लोकमत दीपोत्सव कार्यक्रमात सदर रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.
मराठवाड्यात यंदा भीषण दुष्काळी परिस्थिती असून, पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी उद्योजकांनी मदतीचा हात पुढे करावा, असे
आवाहन लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी राजभवन येथे झालेल्या लोकमत दीपोत्सव कार्यक्रमात केले.
या आवाहनाला प्रतिसाद देत घोडावत यांनी ५१ लाख रुपयांचा धनादेश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपुर्द
केला. (प्रतिनिधी)