ज्याच्यासाठी लेकीचा एवढा शाही साखरपुडा केला, कोण आहे इंदुरीकर महाराजांचा जावई...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:57 IST2025-11-06T11:56:05+5:302025-11-06T11:57:57+5:30
Indurikar Maharaj daughter Engagement : मुळात थाटामाटात विवाह सोहळा, साखरपुडा करणे हे वधू-वराचे तसेच आई-वडिलांचेही स्वप्न असते. इंदुरीकर महाराज यावरच नेहमी बोलून टाळ्या मिळवत होते.

ज्याच्यासाठी लेकीचा एवढा शाही साखरपुडा केला, कोण आहे इंदुरीकर महाराजांचा जावई...
लेकरा-बाळांचे थाटामाटात विवाहसोहळे करू नका, असे सांगणारे इंदुरीकर महाराज सध्या चर्चेत आहेत. कारण त्यांनी स्वत: आपल्या लेकीचा साखरपुडा थाटामाटात लावून दिला आहे. यामुळे लोकांना ब्रम्हज्ञान सांगणारे इंदुरीकर महाराज हे आता टीकेचे धनी ठरू लागले आहेत.
मुळात थाटामाटात विवाह सोहळा, साखरपुडा करणे हे वधू-वराचे तसेच आई-वडिलांचेही स्वप्न असते. इंदुरीकर महाराज यावरच नेहमी बोलून टाळ्या मिळवत होते. परंतू, लोकांना उपदेश करून स्वत:च्या लेकीचा साखरपुडा मात्र राजेशाही थाटात उरकला आहे. मग लग्न कसे करणार, असा सवाल मुंबई डबेवाला संघटनेच्या अध्यक्षांनी विचारला आहे.
आता ज्याच्यासाठी इंदुरीकर महाराजांनी लेकीचा साखरपुडा थाटात उरकला तो जावई कोण आहे, काय करतो, असे सवाल देखील विचारले जात आहेत. तर इंदुरीकर महाराजांच्या लेकीचे नाव ज्ञानेश्वरी देशमुख, हिचा नुकताच साहिल चिलाप नावाच्या तरुणाशी साखरपुडा पार पडला होता. या सोहळ्याला राजकारण्यांसोबत अनेक मान्यवरांची हजेरी होती.
आता हा साहिल चिलाप कोण? काय करतो, याबद्दल लोकांची उत्सुकता ताणली गेली आहे. साहिल चिलाप हा नवी मुंबईत स्थाईक आहे. मुळचे पुण्यातील जुन्नरचे असलेल्या या कुटुंबाचा मुंबईत वाहतूक, बांधकामाचा व्यवसाय आहे. गावाकडे बागायती शेती आहे. आता एवढा मोठा व्यवसाय असलेल्या जावयाचा साधेपणाने साखरपुडा कसा उरकला जाणार, असाही सवाल लोक विचारत आहेत.