इंद्राणीला डिस्चार्ज, रुग्णालयातून पुन्हा तुरुंगात रवानगी

By Admin | Updated: October 6, 2015 18:12 IST2015-10-06T18:12:35+5:302015-10-06T18:12:35+5:30

शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला मंगळवारी संध्याकाळी जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Indrani will be discharged from the hospital again | इंद्राणीला डिस्चार्ज, रुग्णालयातून पुन्हा तुरुंगात रवानगी

इंद्राणीला डिस्चार्ज, रुग्णालयातून पुन्हा तुरुंगात रवानगी

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. ६ - शीना बोरा हत्याप्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला मंगळवारी संध्याकाळी जे जे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज मिळाल्यानंतर इंद्राणीची रवानगी भायखळा कारागृहात करण्यात आली आहे.

पाच दिवसांंपूर्वी प्रकृती खालावल्याने इंद्राणी मुखर्जीला जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला इंद्राणीने गोळ्यांचे अतिसेवन केल्याचा अंदाज होता. मात्र फॉरेन्सिक तपासणीत गोळ्यांचे अतिसेवन केले नसल्याचे उघड झाले आहे. तब्बल तीन दिवस इंद्राणी मुखर्जी बेशुद्धावस्थेत होती. मंगळवारी इंद्राणीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून त्यांना पुन्हा भायखळा येथील कारागृहात नेण्यात आले.

दरम्यान, शीना बोना प्रकरणाचा तपास करणा-या सीबीआयने इंद्राणी मुखर्जीची चौकशी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली असून उद्या न्यायालयात यावर सुनावणी होणार असल्याचे वृत्त आहे.  

Web Title: Indrani will be discharged from the hospital again