मोखाड्यात इंदिरा आवास रखडली
By Admin | Updated: April 26, 2016 05:32 IST2016-04-26T05:32:17+5:302016-04-26T05:32:17+5:30
आदिवासींना निवाऱ्याची गरज पूर्ण व्हावी, त्यांना रहायला हक्काचे घर मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने इंदिरा आवास घरकूल योजना सुरू केली

मोखाड्यात इंदिरा आवास रखडली
मोखाडा : आदिवासींना निवाऱ्याची गरज पूर्ण व्हावी, त्यांना रहायला हक्काचे घर मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाने इंदिरा आवास घरकूल योजना सुरू केली परंतू या योजनेअंतर्गत सन २०१५ ते २०१६ दरम्यान, मोखाड्यात ५०५ घरकुलांना मंजुरी मिळून बराचसा कालावधी उलटला असतांनाही घरकुलाच्या पहिल्या हप्ताची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
तालुक्यात २८ ग्रामपंचायती असून २५९ गावपाडे आहेत. इंदिरा आवास घरकुल योजनेच्या अंतर्गत तालुक्यात ५०५ घरकुले मंजूर करण्यात आली मात्र, पावसाळा जवळ आला असतानाही पहीला हप्ता जमा झाला नसल्याने ही घरकुले कधी व कशी बांधायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या अनास्थेमुळे ही घरकूले रखडली आहेत.
या बाबत अधिक माहिती घेतली असता आॅनलाईन प्रक्रियेमुळे विलंब झाला असल्याचे कारण प्रशासनातील अधिकारी लाभार्थ्यांना सांगत आहेत.
(वार्ताहर)