शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

देशातील कांद्याची निर्यात मालदीवला होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 05:15 IST

केंद्राचा निर्णय : मात्र २० हजार क्विंटलची मर्यादा

नाशिक : देशांतर्गत बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर कमी होत असतानाच केंद्र सरकारने मालदीवला २० हजार क्विंटल कांदा निर्यात करण्याचे ठरविले आहे. परकीय व्यापार महासंचालकांनी तसा आदेश काढला आहे.देशात वेगाने दर वाढत असल्याने सप्टेंबरच्या अखेरीस केंद्राने कांद्याची निर्यातबंदी केली आणि कांद्याची आयात करणे सुरू केले. दरम्यानच्या काळामध्ये कांद्याचे पीक आल्याने पुरवठा वाढून त्याचे दरही काहीसे कमी झाले. त्यामुळे सरकार व ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. सध्या बाजारपेठांत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे दर कमी होत असून केंद्राने निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.त्यामुळे केंद्राने मालदीवला २० हजार क्विंटल कांदा निर्यात करण्यास संमती दिली असून, तो तामिळनाडूच्या तुतीकोरीन बंदरामधून पाठवला जाणार आहे. सन २०१९-२०च्या कोट्यामधून मालदीवला ही निर्यात केली जाणार आहे. या निर्यातीसाठी घालून दिलेल्या कोट्यावर तुतीकोरीनचे कस्टम खाते लक्ष ठेवेल. मालदीवमध्ये कांदा काय दराने विकणार, त्याची खरेदी-विक्री कोण करणार, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. सध्याचा दोन हजार रुपयांचा दर आणि तुतीकोरीनपर्यंत क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपये वाहतूक खर्च आणि निर्याती खर्च याचा विचार करता हा व्यवहार किती फायद्याचा राहील, याबाबत तज्ज्ञांना आहे.निर्यातीच्या निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. अंशत: का होईना निर्यात होणार असल्यामुळे बाजारपेठांमध्ये विक्रीस येणाऱ्या कांद्याच्या दरात भविष्यात काही प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.केंद्राने दिलेली सवलत तोकडी आहे. निर्यातबंदी पूर्णपणे उठविण्याची गरज आहे. वस्तुत: निर्यातबंदी करणेच चुकीचे आहे. त्यामुळे कांदा आयात करणाऱ्यांना आपल्या देशाबद्दल शंका येते. कालांतराने आपल्या निर्यातीवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. केंद्राने निर्यातबंदी न करता देशात कांद्याचे दर चढे असल्यास किमान निर्यातमूल्य वाढविले तरी कांदा बाहेर जाणार नाही. मात्र त्यामुळे आंतरराष्टÑीय बाजारपेठेत देशाबद्दल संशयाचे वातावरण निर्माण होणार नाही.- चांगदेवराव होळकर, माजी संचालक, नाफेड

टॅग्स :onionकांदा