शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

भारतातील मीडिया स्वतंत्रच राहील, जगभरात 'नरेटिव्ह' सेट करण्याची आपली ताकद: अनुराग ठाकूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2023 7:11 PM

Lokmat National Media Conclave: भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल.

नागपूर - जगभरात नॅरेटिव्ह काय बनवायचं हे भारतीय माध्यमे ठरवू शकतात त्याची ताकद येथील माध्यमांमध्ये आहे. नव भारत, सशक्त भारत हा विचार जगभरात देण्याचं काम भारतीय माध्यमे करतील. भारताचा नेरिटिव्ह परदेशी माध्यमे ठरवू शकत नाहीत तर येथील माध्यमे, जनता ठरवतील असं परखड मत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी लोकमत नॅशनल मीडिया कॉन्क्लेव्हमध्ये मांडले. 

मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, ऑनलाईन बातम्या देणाऱ्यांमध्ये भारत पुढे आहेत. भारतात ज्ञानाची कमतरता नाही. भारताकडे आज सर्वकाही आहे जे विकसित देशांकडे आहे. भारतात ५ जी नेटवर्क आलेय. देशाच्या कानाकोपऱ्यात नेटवर्कचे जाळे उभारले जात आहेत. भारताकडे ६ जी नेटवर्कही आपलेच असेल. डिजिटल माध्यमे रिजनल राहिले तर इंटरनॅशनल झालंय. कंटेन्टमध्ये दम असला तर लोकल ते ग्लोबल व्हायला वेळ लागणार नाही. जगातील ज्या वृत्तपत्रांना मोठे म्हटले जाते त्यापेक्षा आपला रिच, व्ह्यूअर्स जास्त आहे. भारतीय माध्यमे परदेशी माध्यमांना टक्कर देण्यास कुठेही कमी नाहीत असं त्यांनी सांगितले. 

सोशल मीडियाच्या बातम्या ट्रेंड होतातआणीबाणीच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबला, त्यावेळी वृत्तपत्रांचा बोलबाला होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई त्याकाळीही भाजपाने लढली होती. आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुणापासून हिरावून घेतले जात नाही. टेलिव्हिजनचं युग आले. इंटरनेट आल्यापासून कुणीही पत्रकार होऊ शकते हे कळालं. आज जिथं मीडिया पोहचू शकत नाही तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रेडिंग बातम्या होतात. त्या प्रमुख माध्यमांमध्ये झळकतात. भारतातील मीडिया जितका स्वातंत्र्य होता, तो आजही स्वातंत्र्य आहे आणि भविष्यातही स्वातंत्र्य राहील असं मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. 

'त्यांना' कोण प्रश्न विचारणार?माध्यमांची भूमिका काय? आणि ते कोण ठरवणार? नेरिटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय माध्यमे करतायेत. १४० कोटींच्या देशात कोण नॅरेटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करू शकतं का? मोदींविरोधात जितका दुष्प्रचार केला जातो त्यातून ते आणखी मजबुतीने उभे राहतात. देशाची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय माध्यमाकडून होतो पण त्यात आता आपले देशातील राजकीय नेतेही त्याचा फायदा घेतात. देशात कोरोना लस निर्माण झाली पण त्यावरही प्रश्न उपस्थित केले. भारतात कोट्यवधी लोकं मरतील असा रिपोर्ट आला मग आता त्यांना कुणी प्रश्न विचारणार का? असा सवाल मंत्री अनुराग ठाकूर यांनी विचारला.