शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

Indian tree day; अडीच वर्षांत अडीच हजार देशी झाडांचे संगोपन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 13:00 IST

वृक्ष संवर्धन एकच नारा: हरित वसुंधरा फाउंडेशनचा उपक्रम

ठळक मुद्देउन्हाळ्यातील तापमानाची वाढती तीव्रता आणि कमी होणारे पर्जन्यमान ही सुध्दा सोलापूरची एक ओळखच बनली आहे.पुढच्या उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता कमी करायची असेल तर आत्तापासूनच प्रयत्न करावे लागतील. हरित वसुंधरा फाउंडेशनने 'एक व्यक्ती एक झाड' या उपक्रमाचे आयोजन केले

विलास जळकोटकर

सोलापूर: अत्यल्प पर्जन्यमान... वाढते तापमान अन् यामुळे निर्माण होणाºया विदारक स्थिीतील ‘तुम्ही आम्ही सर्वजण’ जबाबदार आहोत या जाणिवेतून सुरु झालेल्या हरित वसुंधरा फाउंडेशनने गेल्या तीन वर्षांपासून शहरात, परिसरात, जिल्ह्यात देशी रोपांची लागवड  अन् संगोपनाचे कार्य आरंभिले     आहे. गेल्या अडीच वर्षात या फाउंडेशनने विनामूल्य २५०० ठिकाणी वृक्षारोपण करु न ती जगवताना पर्यावण संवर्धनासाठी प्रयत्न चालवला आहे.

१५ आॅगस्ट २०१६ साली छोटसं जांभळाचा रोपटं लाऊन अमित बनसोडे यांच्यासह त्यांंच्या मित्रपरिवानानं  हरित वसुंधरा फाउंडेशनचा श्रीगणेशा केला. पर्यावरणासाठी उपयुक्त अशा देशी झाडांचे वृक्षारोपण करुन ती जपण्यासाठी हा उपक्रम चालवला आहे. वृक्षारोपणासाठी कोणत्याही प्रकारचे मूल्य न आकारता लागणारी रोपं, साहित्य, खड्डे हा संपूर्ण खर्च फाऊंडेशनच्या माध्यमातून केला जात असल्याचे सांगण्यात आले.

आजवर शिवाजीनगर (गुलमोहर सोसायटी), कुमठा नाका सोलगी नगर), विजापूर रोड (जवान नगर), रविवार पेठ, लक्ष्मण महाराज नगर, पुणे नाकार, अक्कलकोट रोड (इस्कॉन टेम्पल), स्टरलिंग मोटार (शिवाजीनगर), एमआयडीसी नगर (आशानगर), जिल्हा क्रिडा संकूल, बाळे, मोदी, जिल्ह्यातील गुळवंची, नान्नज, मंगळवेढा, होटगी आदी परिसरात लावलेली झाडांचे छान संगोपन झाल्याचे सिद्धेश्वर टेंगळे यांनी स्पष्ट केले. 

या उपक्रमासाठी अमित बनसोडे, सिद्धेश्वर टेंगळे, द्वारकेश सावंत, सागर चिंचोळकर, संतोष वायदंडे, अर्जुन  बनसोडे,  रोहन खंदारे, दीपक  गायधनकर, अजय आलुरे, रोहित कसबे, प्रशांत गाजूल, नरेश गाजूल, योगेश लोखंडे, सागर संभारम, तानाजी गोरड, तानाजी  यादव ही मंडळी कार्यरत आहेत.

वृक्षारोपणासाठी वापरलेली झाडे- वूक्षारोपणासाठी प्रामुख्याने देशी पर्यावरणपूरक, आॅक्सिजन देणाºया वृक्षांचे रोपण करण्यावर या फाऊंडेशनने भर दिला आहे. यामध्ये पिंपळ, कडुलिंब, आवळा, कांचन, चिंच, कवट, बेंडा, वड, गुगळ, रानभेंडी, जांभळ, उंबर, आबा अशा झाडांचा समावेश आहे. सोलापूरचे वाढते तापमान रोखावे, हरित सोलापूर होण्याच्या दृष्टीने चालवलेल्या या प्रयत्नासाठी सक्रीय सहभाग  नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

एक व्यक्ती एक झाड उपक्रम- उन्हाळ्यातील तापमानाची वाढती तीव्रता आणि कमी होणारे पर्जन्यमान ही सुध्दा सोलापूरची एक ओळखच बनली आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. पुढच्या उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता कमी करायची असेल तर आत्तापासूनच प्रयत्न करावे लागतील. म्हणूनच हरित वसुंधरा फाउंडेशनने 'एक व्यक्ती एक झाड' या उपक्रमाचे आयोजन केले आहे. एक रोप देऊन सर्वजण या उपक्रमात आपण सहभागी होऊ शकता. फाऊंडेशनच्या वतीने ही रोपं सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात लावली जातील. आपल्या घराच्या परिसरात, रस्त्याच्या दुतर्फा, शाळांमध्ये, महाविद्यालयात, धार्मिकस्थळ आणि कार्यालयाच्या परिसरात मोफत वृक्षारोपणासाठी आपण फाउंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentवातावरण