इंडियन एअरफोर्सचे ग्रुप कॅप्टनची आत्महत्या
By Admin | Updated: August 1, 2016 01:11 IST2016-08-01T01:11:20+5:302016-08-01T01:11:20+5:30
इंडियन एअरफोर्स चे गृुप कॅप्टन एम. एस. जयसिम्हा (वय ४७) यांनी रविवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली.

इंडियन एअरफोर्सचे ग्रुप कॅप्टनची आत्महत्या
नागपूर : इंडियन एअरफोर्स चे गृुप कॅप्टन एम. एस. जयसिम्हा (वय ४७) यांनी रविवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
सोनेगावच्या एअरफोर्स सेंटरमध्ये कार्यरत असलेले जयसिम्हा त्यांची पत्नी आणि दहा वर्षीय मुलीसोबत ग्रीनसिटी, २०२,फ्रेण्डस कॉलनीत राहत होते. रविवार असल्याने ते आज दुपारी आपल्या पत्नी आणि मुलीसह घरात टीव्ही बघत होते. दुपारी ३ च्या सुमारास ते आपल्या शयनकक्षात गेले. बराच वेळ होऊनही ते परत आले नाही. त्यामुळे पत्नीने आवाज दिले. प्रतिसाद न मिळाल्याने पत्नी शयनकक्षात गेली. त्यावेळी त्यांना जयसिम्हा गळफास लावलेल्या अवस्थेत दिसले. पत्नीने आरडाओरड करून शेजा-यांना गोळा केले. जयसिम्हा यांचा गळफास सोडून त्यांना डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती कळताच एअरफोर्सचे अनेक अधिकारी जयसिम्हा यांच्या घरी पोहचले. गिट्टीखदान पोलिसांनाही कळविण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाची आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.