पायाभूत सुविधांवर भर दिला तर विदेशी उद्योगांसाठी भारत ठरेल प्रवेशद्वार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 14:00 IST2025-08-26T13:59:52+5:302025-08-26T14:00:41+5:30
Lokmat Global Economic Convention London 2025: देशात वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळेच आता विदेशातील मोठे उद्योग, गुंतवणूकदार सकारात्मक झाले आहेत. त्यामुळेच आगामी काळात विदेशी उद्योगांसाठी भारत प्रवेशद्वार ठरेल, असा विश्वास ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्व्हेंशन’मध्ये मान्यवरांनी व्यक्त केला.

पायाभूत सुविधांवर भर दिला तर विदेशी उद्योगांसाठी भारत ठरेल प्रवेशद्वार
लंडन - देशात वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधांमुळेच आता विदेशातील मोठे उद्योग, गुंतवणूकदार सकारात्मक झाले आहेत. त्यामुळेच आगामी काळात विदेशी उद्योगांसाठी भारत प्रवेशद्वार ठरेल, असा विश्वास ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक्स कन्व्हेंशन’मध्ये मान्यवरांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.चे माजी व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘पायाभूत सुविधा : भारताच्या विकासाचे प्रवेशद्वार’ या परिसंवादात मान्यवरांनी भारत आणि महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचा वेध घेतला. या परिसंवादात न्याती ग्रुपचे चेअरमन डॉ. नितीन न्याती, अजंता फार्माचे व्हाइस चेअरमन मधुसूदन अग्रवाल, एमआयसीएल कन्स्ट्रक्शन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक मनन शाह, ‘युएस’मधील शेलाडिया असोसिएटचे अध्यक्ष मनीष कोठारी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, जे. कुमार एन्फ्राप्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक नलीन गुप्ता, सॉलिटीअर ग्रुपचे संचालक प्रमोद रांका यांचा सहभाग होता.
दीक्षित म्हणाले, सध्याची वेळ ही विकासासाठी मोठे आव्हान असून टॅरिफ पॉलिसीमुळे अनिश्चितता वाढली आहे. भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असली तरी सध्याचा काळ हा बदलाचा आहे. भारतात सेमिकंडक्टर, डेटा सेंटरचे प्रकल्प येऊ घातले आहेत. तसेच ए.आय. तंत्रज्ञानाचीही नवी आव्हाने समोर आहेत.
यावेळी मधुसूदन अग्रवाल, नलिन गुप्ता, अनिल गायकवाड, मनन शाह, प्रमोद रांका, मनीष कोठारी यांनी भारत हा पायाभूत सुविधा उभारणी आणि विकासासाठी सक्षम आहे. मात्र सुविधा नसतील तर व्यवसाय सुलभतेने होत नाही. त्यामुळे पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या तरच हा देश झेपावेल. येणाऱ्या काळात भारत आर्थिक महासत्ता निश्चित होईल.