शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय"; भारत-अमेरिका करारावर देवेंद्र फडणवीसांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 09:19 IST

नव्या करारानुसार, भारतीय वस्तूंवर आकारला जाणारा 'रेसिप्रोकल टॅरिफ' २५ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला

Devendra Fadnavis on India US Deal tarrifs: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबत अनेक महिन्यांपासून रखडलेला व्यापार करार झाला असल्याची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या करारानुसार, भारतीय वस्तूंवर आकारला जाणारा 'रेसिप्रोकल टॅरिफ' २५ टक्क्यांवरून १८ टक्के केला. या निर्णयाची माहिती ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दिली. भारताचे पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद साधणे माझ्यासाठी सन्मानाची बाब होती. ते माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांपैकी एक आहेत, असे ट्रम्प यांनी म्हणाले. या मोठ्या निर्णयानंतर भारत-अमेरिका संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचे बोलले जात आहे. राज्याचे मुख्य-मंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मत व्यक्त केले आहे.

"मैत्रीचा एक नवीन अध्याय! भारत आणि अमेरिकेमधील ऐतिहासिक व्यापार करार हा खऱ्या अर्थाने मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय आहे. जागतिक व्यापारासाठी सुद्धा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण क्षण आहे. जगातील प्रमुख निर्यात करणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताला आता अमेरिकेकडून प्राधान्य टॅरिफ दर मिळणार आहे. यातून भारत-अमेरिका मैत्रीच्या नव्या युगाची सुरुवात झाली आहे. हा करार भारतीय व्यावसायिकांसाठी अनेक नूतन आणि उत्साहवर्धक संधींचे द्वार खुले करेल आणि ही दोन्ही देशांसाठी फायदेशीर अशी बाब ठरेल. महाराष्ट्र हे कायम निर्यातीत अग्रेसर असलेले राज्य आहे. त्यामुळे हा करार आपल्या राज्यातील व्यवसायासाठी नवे क्षितिज खुले करेल. डेटा सेंटर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्रांतिकारी आधुनिक तंत्रज्ञानामध्ये महाराष्ट्राला मोठी गुंतवणूक प्राप्त होईल," असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्याशी असलेल्या मैत्री आणि परस्पर आदरातून, तसेच त्यांच्या विनंतीनुसार तत्काळ प्रभावाने अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापार करारावर सहमती झाली आहे. या करारानुसार अमेरिका रेसिप्रोकल शुल्क २५ टक्क्यांवरून १८ टक्के इतके कमी करेल. त्याचप्रमाणे भारतही अमेरिकेविरुद्धचे आपले शुल्क आणि इतर अडथळे टप्प्याटप्प्याने शून्यापर्यंत कमी करण्याच्या दिशेने पुढे जाईल, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Modi-Trump Friendship Wins: Fadnavis on India-US Trade Deal

Web Summary : A historic India-US trade deal, hailed by Fadnavis as a victory of Modi-Trump friendship, will reduce tariffs. The agreement promises new opportunities for Indian businesses, especially in Maharashtra, fostering growth in data centers and AI.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAmericaअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प