जागतिक 'लठ्ठ'पणात भारत तिसरा
By Admin | Updated: May 30, 2014 18:16 IST2014-05-30T18:16:39+5:302014-05-30T18:16:39+5:30
एका सर्वेक्षणात जागतिक लठ्ठपणाच्या यादीत भारताने तिसरा क्रमांक मिळविला आहे.

जागतिक 'लठ्ठ'पणात भारत तिसरा
>ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. ३० - वॉशिग्टंन विद्यापीठातील हेल्थ मॅट्रीक्स एन्ड इवेल्यूशन इन्स्टीट्यूटने (आईएचएमई )केलेल्या एका सर्वेक्षणात जागतिक लठ्ठपणाच्या यादीत भारताने तिसरा क्रमांक मिळविला आहे.
अमेरिका प्रथम स्थानावर असून चीन दुस-या तर भारत तिस-या क्रमांकावर आहे. जर्मनी चौथ्या, रशिया पाचव्या स्थानावर आहे. जगातील जवळपास एक तृतियांश लोकसंख्या ही लठ्ठपणामुळे त्रस्त आहे. १९८० मध्ये हा आकडा ८५.७ कोटी होता तर २०१३मध्ये हा आकडा २.१ अब्जापर्यंत पोहोचला आहे. उंचीपेक्षा वजन जास्त असणा-या व्यक्तीला लठ्ठ संबोधण्यात आल्याची माहिती सर्वेत देण्यात आली आहे. स्वस्तातील खाद्यपदार्थ, व्यायामाची कमतरता, काही औषधी, पुरेशी झोप न मिळणे, ताणतणाव आणि अनुवांशिकपणा हे लठ्ठपणाची प्रमुख कारणे सांगण्यात आली आहेत.