शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला दणका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 17:00 IST

Eknath Shinde On Boycott Turkey and Azerbaijan: भारतावरील हल्ल्यादरम्यान भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाडलेले ड्रोन तुर्कीने बनवण्यात आल्याचे समजताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.

भारत- पाकिस्तान यांच्यातील युद्धविरामानंतर तुर्कीचे पाकिस्तानवरील प्रेम उघडपणे समोर आले. भारतावरील हल्ल्यादरम्यान भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने पाडलेले ड्रोन देखील तुर्कीने बनवण्यात आल्याचे समजताच संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. मुंबई, दिल्ली सारख्या मोठ्या शहरांमध्ये तुर्की आणि अझरबैजानमधून येणाऱ्या वस्तुंवर बहिष्कार टाकण्यात आला. याशिवाय, या दोन्ही देशात जाणाऱ्या ६० टक्के भारतीय पर्यटकांनी आपले बुकिंग रद्द केली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देशातील व्यापारी आणि पर्यटकांच्या निर्णयाचे स्वागत केले.

भारत आणि पाकिस्तानमधील अलिकडच्या सीमेवरील हल्ल्यातही तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पुरवल्याची माहिती समोर आली. भारतात याविरुद्ध प्रचंड संताप आहे आणि बहिष्कार तुर्की मोहीम तीव्र झाली. देशातील व्यापाऱ्यांनी तुर्कीमधून तुर्की सफरचंद खरेदी करणे बंद केले. याचबरोबर पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्कीला जाणारे प्रवास पॅकेजेस देखील रद्द केले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?"पुणे, राजस्थानसह अनेक राज्यांतील व्यापाऱ्यांनी तुर्की आणि अझरबैजानवर बहिष्कार टाकला आहे. मी त्याचे स्वागत करतो कारण ते देशभक्ती दर्शवतात. तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला, ज्याने आपल्या निष्पाप नागरिकांना मारले आहे. त्यामुळे तुर्कीवर पूर्ण बहिष्कार टाकला पाहिजे", असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात मोठे नुकसान होण्याची शक्यताभारताने टाकलेल्या बहिष्कारामुळे तुर्की आणि अझरबैजान यांना पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पुण्यात तुर्की सफरचंदांवर बहिष्कार टाकण्यात आला, ज्यामुळे मागणीत ५० टक्के घट झाली. हिमाचल, उत्तराखंड आणि इराणमधून सफरचंद खरेदी केले जात आहेत. यामुळे तुर्कीला कोट्यावधींचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPuneपुणे