शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय; 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटप ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2023 16:48 IST

I.N.D.I.A Meeting: विरोधकांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. यात 13 सदस्यीय समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे.

I.N.D.I.A Meeting: विरोधकांच्या  I.N.D.I.A आघाडीची मुंबईत बैठक झाली. या बैठकीत शुक्रवारी मोठा निर्णय घेण्यात आला. यावेळी 13 सदस्यीय समन्वय समितीची घोषणा करण्यात आली आहे. या पॅनेलमध्ये केसी वेणुगोपाल, शरद पवार, एमके स्टॅलिन, संजय राऊत, तेजस्वी यादव, अभिषेक बॅनर्जी, राघव चढ्ढा, जावेद खान, लल्लन सिंग, हेमंत सोरेन, डी राजा, ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांचा समावेश आहे. ही समिती येत्या 30 सप्टेंबरपर्यंत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणार आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले की, आमच्या दोन्ही बैठका यशस्वी ठरल्या. कारण, आमच्या बैठकांनंतर पंतप्रधानांनी त्यांच्या त्यानंतरच्या भाषणात केवळ भारतावर टीका केली नाही, तर आपल्या प्रिय देशाचाही अपमान केला आहे. त्यांनी चक्क दहशतवादी संघटनेशी तुलना केली. या सरकारच्या सूडाच्या राजकारणामुळे येत्या काही महिन्यांत आणखी हल्ले, आणखी छापे आणि अटकेसाठी आपण तयार असले पाहिजे.

खर्गे पुढे म्हणाले, आमची आघाडी जितकी मोठी होईल, तितका भाजप सरकार आमच्या नेत्यांविरोधात एजन्सीचा दुरुपयोग करेल. महाराष्ट्र, राजस्थान आणि बंगालमध्येही त्यांनी असेच केले. गेल्या आठवड्यात झारखंड आणि छत्तीसगडमध्ये ही कारवाई करण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला राज्यांवर नियंत्रण ठेवायचे आहे. राज्यांना कर महसुलातील त्यांच्या वाट्यापासून वंचित ठेवले जात आहे. विरोधी शासित राज्यांना मनरेगाची थकबाकी दिली जात नाही, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

'जुडेगा भारत, जीतेगा इंडिया'I.N.D.I.A. कडून सर्व प्रकारचा संवाद आणि माध्यमांसंदर्भातील रणनीती, तसेच कॅम्पेनची थीम वेगवेगळ्या भाषांमध्ये असेल. ही थीम "जुडेगा भारत, जीतेगा इंडिया", अशी असेल. हेही या बैठकीत निश्चित करण्यात आले. लवकरच देशाच्या विविध भागांमध्ये संयुक्त रॅलीचे आयोजन केले जाईल. सार्वजनिक प्रश्नांवर या रॅली केल्या जातील. याशिवाय, विविध राज्यांमध्ये जागा वाटपाची प्रक्रियाही लवकरच सुरू होईल. ही प्रक्रिया गिव्ह अँड टेक भावनेने पूर्ण केली जाईल. तसेच, आगामी लोकसभानिवडणूक सर्व पक्ष एकत्रितपणे लढतील, असा निर्ययही या I.N.D.I.A. आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला.

टॅग्स :INDIA Opposition Allianceइंडिया आघाडीMumbaiमुंबईcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपा