भारत-चीनचा पुण्यात युद्धसराव
By Admin | Updated: November 14, 2014 00:36 IST2014-11-14T00:36:56+5:302014-11-14T00:36:56+5:30
भारत आणि चीनमधील संयुक्त युद्धसराव मोहिमेअंतर्गत दोन्ही देशांच्या लष्करांचा एकत्रित सराव पुण्यातील औंध येथील लष्कराच्या जागेवर होणार आहे.

भारत-चीनचा पुण्यात युद्धसराव
पुणो : भारत आणि चीनमधील संयुक्त युद्धसराव मोहिमेअंतर्गत दोन्ही देशांच्या लष्करांचा एकत्रित सराव पुण्यातील औंध येथील लष्कराच्या जागेवर होणार आहे. दि. 16 नोव्हेंबर रोजी हा युद्धसराव होणार असून, दहशतवादविरोधी कारवाया आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये होणा:या लष्करी हालचालींचा अभ्यास या सरावामध्ये होणार आहे.
भारत आणि चीन यांच्यामधील युद्धसरावाची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी 2क्क्7 आणि 2क्13मध्ये चीनमध्ये दोन्ही देशांच्या जवानांनी युद्धसराव केला होता. 2क्क्8मध्ये बेळगावमध्ये दोन्ही देशांचे जवान एकत्र आले होते. त्याच मालिकेतील चौथ्या सरावासाठी भारतीय सैन्यदल आणि चीनची पिपल्स लिबरेशन आर्मी औंधमध्ये एकत्र येणार आहेत. औंधमध्ये लष्कराची शिवनेरी बटालियन आहे. हा सराव जवानांच्या कंपनी स्तरावर होणार आहे. दोन्ही देशांच्या संयुक्त परीक्षण समितीतर्फे या सरावाचे निरीक्षण करण्यात येणार आहे. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरची या सरावासाठी मदत घेण्यात येणार आहे. या कार्यक्र माला दोन्ही देशांच्या लष्करातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.