शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

India China Faceoff: मोदीजी, चीनला खूश करण्यासाठी 'ते' धोकादायक विधान केलंत का?; काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 13:59 IST

लडाखमधील भारत-चीन तणवावरून काँग्रेस आक्रमक; मोदींवर प्रश्नांची सरबत्ती

मुंबई: लडाख सीमेवर निर्माण झालेल्या तणावावरून काँग्रेसनं मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. भारतीय जमिनीवर कोणीही घुसखोरी केली नाही, असं अत्यंत धोकादायक विधान मोदींनी का केलं, असा सवाल काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. मोदींनी केलेल्या वक्तव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम झाला असून पुढील वाटाघाटीत आणि चर्चेत त्याचा फटका भारताला बसू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. १५ जूनला गलवान खोऱ्यात चिनी सैन्यानं भारतीय जवानांवर हल्ला केला. त्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर मोदींनी सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भारतीय भूमीवर कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचा दावा केला. तो धागा पकडून पृथ्वीराज चव्हाण यांनी काही प्रश्न विचारले. आमच्या देशात घुसखोरीच झाली नाही असं अत्यंत धोकादायक विधान मोदींनी का केलं? त्यांच्या विधानाचं चीनकडून स्वागत झालं. चीनच्या अध्यक्षांसोबतचे संबंध जपण्यासाठी मोदींनी हा अतिशय धोकादायक दावा केला का? असे प्रश्न चव्हाण यांनी विचारले.लडाखवरील प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. मोदींच्या विधानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम झाला. चीनकडून त्यांचं कौतुक झालं. चीनमध्ये त्यांची लोकप्रियता वाढली. मात्र मोदींच्या विधानामुळे भारताच्या वाटाघाटी करण्याच्या क्षमतेवर प्रतिकूल परिणाम आहे. मोदींनी असे दावे करून चिनी कटकारस्थांना बळ देऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं.चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग आणि मोदींचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. आतापर्यंत त्यांच्यात १९ बैठका झाल्या आहेत. भारतात आलेले जिनपिंग अहमदाबादलाच गेले होते. त्यामुळे त्यांना न दुखावण्याच्या हेतूनं मोदींनी घुसखोरी झालीच नसल्याचा दावा केला का, असा सवाल चव्हाण यांनी विचारला. गलवान खोरं, पँगाँग परिसरात चीननं मोठा फौजफाटा तैनात केला आहे. लष्करीदृष्ट्या महत्त्वाची बांधकामं केली आहेत. सॅटेलाईट फोटोंमधून ते उघड झालं आहे. त्यामुळे मोदींचा दावा आपोआप खोडला गेला आहे, असं चव्हाण म्हणाले. प्रश्न उपस्थित करणं विरोधकांचं काम असून त्या प्रश्नांना उत्तरं देणं ही सरकारची घटनात्मक जबाबदारी असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणchinaचीन