त्यांच्या चुकांमुळे भारत देश मागे जातोय, प्रज्ञा पवार यांची नरेंद्र मोदींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2017 16:46 IST2017-09-24T16:40:29+5:302017-09-24T16:46:04+5:30

परवा एका कार्यक्रमात आपले प्रधान सेवक बोलले की, लहान सहान विचार मी करत नाही. 125 कोटी भारतीय सतत माझ्या समोर असल्याने मी स्वप्नसुद्धा मोठी पाहतो. मात्र त्यांनी सांगितले नाही की मी चुका पण अशा मोठ्याच करतो. त्यांच्या अशा चुकांमुळे भारत देश मागे जातोय, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी केली आहे.

India is behind the country due to their mistakes, Pradnya Pawar criticizes Narendra Modi | त्यांच्या चुकांमुळे भारत देश मागे जातोय, प्रज्ञा पवार यांची नरेंद्र मोदींवर टीका

त्यांच्या चुकांमुळे भारत देश मागे जातोय, प्रज्ञा पवार यांची नरेंद्र मोदींवर टीका


ठाणे, दि. 24 - परवा एका कार्यक्रमात आपले प्रधान सेवक बोलले की, लहान सहान विचार मी करत नाही. 125 कोटी भारतीय सतत माझ्या समोर असल्याने मी स्वप्नसुद्धा मोठी पाहतो. मात्र त्यांनी सांगितले नाही की मी चुका पण अशा मोठ्याच करतो. त्यांच्या अशा चुकांमुळे भारत देश मागे जातोय, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी केली आहे. तसंही विद्यमान सत्ताधा-यांना व त्यांचा रिमोट नागपुरात असलेल्यांना भारताला राज्यघटनापूर्व काळात न्यायचे आहे का, अशी टीका ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी ठाण्यात केली आहे. ठाणे जिल्हा साहित्य संमेलन रविवारी सहयोग मंदिर येथे आयोजिले होते. त्याचं अध्यक्षस्थान भूषवताना त्या बोलत होत्या.

Web Title: India is behind the country due to their mistakes, Pradnya Pawar criticizes Narendra Modi