निर्देशांक पुन्हा घसरला

By Admin | Updated: June 20, 2014 00:28 IST2014-06-20T00:28:21+5:302014-06-20T00:28:21+5:30

इराकमधील संकटामुळे तेलाच्या किमती वाढत असून, त्याचा परिणाम मुंबई शेअरबाजाराच्या निर्देशांकावर झाला.

The index receded | निर्देशांक पुन्हा घसरला

निर्देशांक पुन्हा घसरला

>मुंबई : इराकमधील संकटामुळे तेलाच्या किमती वाढत असून, त्याचा परिणाम मुंबई शेअरबाजाराच्या निर्देशांकावर झाला. या अस्थिरतेमुळे निर्देशांक पहिल्या प्रहरात वाढला; पण नंतर ओएनजीसी व आरआयएल यांच्या शेअरच्या किमती घसरल्यामुळे निर्देशांकात घसरण झाली व सेन्सेक्स 44.45 अंकांनी घसरून 25,2क्1.8क् वर बंद झाला. 
अमेरिकेच्या फेडरल बँकेने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल सकारात्मक संकेत दिले असून, सर्वसमावेशक आर्थिक धोरण ठेवण्यास मान्यता दिली आहे, त्यामुळे सकाळच्या प्रहरात सेन्सेक्समध्ये चांगली वाढ झाली. सुरुवातीला 25,327 र्पयत चढलेला सेन्सेक्स आणखी वाढला व 25,425.85 र्पयत गेला. यावेळी आयटी, टेक, रिअल्टी व पॉवर शेअर्सना चांगली मागणी होती. 
पण नंतर सरकारी तेल कंपनी ओएनजीसीचे शेअर्स 5.13 टक्के कोसळले, या घसरणीने पाच वर्षाचा नीचांक गाठला आहे. गेलचे 1.88 टक्के तर रिलायन्सच्या आरआयएल कंपनीचे 2.38 टक्के नुकसान झाले आहे. सरकारी तेल कंपन्या एचपीसीएल - 3.97 टक्के, बीपीसीएल -4.67 तोटय़ात आहेत. नैसर्गिक वायूच्या किमती वाढणार असल्यानेही गुंतवणुकीवर परिणाम झाला आहे. तेल व वायूच्या कंपन्यांचे नुकसान झाल्यामुळे शेअर बाजार घसरला असून, 25,2क्1.8क् अंकावर बंद झाला आहे. 
 
4सीएनएक्सचा निर्देशांक 17.5क् अंकांनी घसरला असून, 754क्.7क् वर बंद झाला आहे. हे नुकसान क्.23 टक्के आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी बुधवारी 366.18 कोटी रु.चे भांडवल आणले; पण तरीही निर्देशांक सावरू शकला नाही. तेलाच्या किमती वाढत असल्याने आयात खर्च वाढण्याची भीती असून, महागाई भडकण्याची शक्यता आहे. 

Web Title: The index receded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.