शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

साध्वींसाठी स्वतंत्र व्यवस्था!

By admin | Updated: July 18, 2015 00:17 IST

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यातील महिला आणि पुरुष साधुंमधील वादावर पडदा पडला असून, येत्या दोन-तीन दिवसांत साध्वींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याची घोषणा

मुंबई : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यातील महिला आणि पुरुष साधुंमधील वादावर पडदा पडला असून, येत्या दोन-तीन दिवसांत साध्वींसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार असल्याची घोषणा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत केली. सिंहस्थ कुंभमेळा सुरू झाला तरी पायाभूत सुविधांची कामे अपूर्ण असल्याबद्दल जयंतराव जाधव यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना महाजन म्हणाले की, नाशिक येथील तपोवन आणि साधुग्राममधील पायाभूत सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत. या कुंभमेळ्यासाठी एकूण २३७८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यापैकी २५ टक्के निधी महापालिका उपलब्ध करून देणार आहे. तर उर्वरित निधी राज्य आणि केंद्र सरकार देणार आहे. मात्र केंद्र सरकारकडून ६८९ कोटींचा निधी अजूनही प्राप्त न झाल्यामुळे नाशिक महापालिकेला कर्ज काढावे लागल्याचे सांगत केंद्राचा हिस्सा मिळवण्यासाठी राज्य सरकारतर्फे पाठपुरावा केला जात आहे, असेही ते म्हणाले. प्र्रशासनाकडे डॉक्टरांची कमतरता असल्याने कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच साधुग्राम येथील संत, महंत यांच्यासाठी पुरेसा धान्यपुरवठा होत नसल्याची बाबही शासनाने गंभीरपणे घेतली असून, त्याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. (प्रतिनिधी)जंतुनाशकाच्या खरेदीची चौकशी कुंभमेळ्याकरिता साडे चार कोटींची जंतुनाशके आरोग्य विभागाने खरेदी करून ती परस्पर नाशिकला पाठवण्यात आली. मात्र महानगरपालिकेने या जंतुनाशकांची मागणी केलीच नव्हती. मग या जंतुनाशकांची परस्पर खरेदी का केली गेली त्याची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आल्याची माहिती महाजन यांनी या लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान दिली.व्हीआयपी व व्हीव्हीआयपींना बंदीपंतप्रधानांसह ज्येष्ठ नेत्यांना कुंभमेळ्याचे निमंत्रण दिले आहे. मात्र, शाही स्नानावेळी मोठी गर्दी होते. त्यामुळे या काळात व्हीआयपी व व्हीव्हीआयपीला प्रवेश देऊ नये, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी केली आहे. त्याप्रमाणे शाही स्नानाप्रसंगी व्हीआयपींना मनाई केली आहे. विमानसेवेसाठी पाठपुरावा करणारनाशिक-पुणे विमानसेवा मागील आठवड्यात सुरू केली. परंतु विमानाचे भाडे ५ हजार व हॉल्टींग चार्ज ३५ हजार रुपये हा खर्च खासगी कंपनीला परवडत नसल्याने कंपनीने ही सेवा बंद केली. त्यामुळे भाडे कमी करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. - गिरीश महाजन