शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
2
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
3
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
4
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
5
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
6
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
7
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
8
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
9
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
10
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
13
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
14
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
15
वर्षभरापूर्वीच झाले लग्न, पतीचे दुसऱ्या महिलेसोबत अनैतिक संबंध; मृदंगाचार्य अमोल लघाणेच्या पत्नीने...; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
16
‘लोक माझ्यावर जळतात, माझ्याविरोधात…’, पराभवानंतर अजिंक्य रहाणे संतापला, टीकाकारांवर बरसला
17
Peace Of Mind: नातं की ओझं? भगवान बुद्धांच्या 'या' एका सूत्राने दूर होईल तुमच्या मनातील सर्व गोंधळ!
18
Success Story: १०,००० पगार ते ४०० कोटींचा व्यवसाय, कसा होता ब्रॉडबँड सेवा पुरवणाऱ्या जम्मू काश्मीरच्या विवेक रैनांचा प्रवास?
19
गोरखपूर ट्रेन नाही, रत्नागिरी पॅसेंजरमुळे ८ लोकलला फटका; दादरला येणार की नाही? मध्य रेल्वे म्हणते…
20
होर्मुझचा तिढा सुटला नाहीय तोच समुद्रात अमेरिका-चीन एकमेकांविरोधात उभे ठाकले; पनामाचा वाद उफाळला... 
Daily Top 2Weekly Top 5

अजून एक अपक्ष आमदार शिवसेनेच्या गोटात, मंजुळा गावित यांनी दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2019 17:19 IST

विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थानांच्या समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सत्तास्थानांच्या समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भाजपा आणि शिवसेना यांच्यात रस्सीखेच सुरू झाली आहे. त्यामुळे नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारमध्ये आपले वजन वाढावे यासाठी दोन्ही पक्षांकडून आपापले संख्याबळ वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दोन्ही पक्षांकडून अपक्ष आमदारांना आपापल्या गोटात खेचले जात आहे. आता शिवसेनेला अजून एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा मिळाला आहे. साक्री येथील अपक्ष आमदार मंजुळा गावित यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष मंजुळा गावित विजयी झाल्या होत्या. त्यांनी भाजपाचे उमेदवार मोहन सूर्यवंशी यांचा पराभव केला होता. दरम्यान, आज मंजुळा गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेत शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 62 वर पोहोचले आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 56 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर बच्चू कडू आणि राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता. अहमदनगरमधील नेवासा मतदारसंघातील आमदार शंकरराव गडाख यांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला होता.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाsakri-acसाक्री