शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 20:03 IST

भारत पाकिस्तान सामन्यावरुन आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

Aditya Thackeray on IND VS PAK Match: भारताने पाकिस्तानला हरवून आशिया कप जिंकला. भारत स्पर्धेत अपराजित राहिला आणि पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला. तिलक वर्माने भारतासाठी एक अपवादात्मक खेळी खेळली आणि नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. मात्र या विजयानंतर राजकारण तापलं आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानला भारताने पुन्हा एकदा धूळ चारली. यावेळी भारतीय संघाने  आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यावरुनच आदित्य ठाकरे यांनी टीका केली. ट्रॉफी न स्विकारणं आणि हस्तांदोलन न करणं ही सगळी नाटकं असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.

आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेट्सने हरवून ९ व्यांदा विजेतेपद पटकावले. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने आले होते. त्यामुळे सामन्यांमध्ये खेळाडूंमध्ये तणाव पाहायला मिळाला. सुरुवातीपासून भारतीय संघाने पाकिस्तानी संघाला महत्त्व दिलं नाही. त्यानंतर ट्ऱॉफी स्विकारण्यासही नकार दिला. या कृतीमुळे भारतीय संघाचे कौतुक करण्यात येत आहे. दुसरीकडे यावरुन आदित्य ठाकरे यावरुन भाजपवर निशाणा साधला. आपण हा सामना  खेळायला नको होता, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तर  भाजप आपल्याला अशी देशभक्ती शिकवणार का? असाही सवाल आदित्य ठाकरे यांनी केला.

"हात मिळवणे किंवा न मिळवणे, ट्रॉफी घेणे किंवा न घेणे, ही सगळी नाटकं आहेत. सगळ्यात आधी आपण खेळायला नको होते. पाकिस्तानने बिहारमधील हॉकी आशिया कपवर बहिष्कार टाकला. आपण यावर बहिष्कार टाकू शकलो नसतो का? हे संपूर्ण ऑपरेशन सिंदूर पहलगाममध्ये आपल्या भारतीय नागरिकांना मारल्यामुळे घडले. भाजप असेही म्हणते की त्यांना मारण्यात आले कारण ते हिंदू होते. गेल्या वर्षी आपल्याला सांगण्यात आले की बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. म्हणूनच बीसीसीआयने त्यांना येथे बोलावले आणि बांगलादेशसोबत द्विपक्षीय मालिका खेळली. त्याच भारत सरकारने बांगलादेशला तांदूळ आणि धान्य पाठवले. या वर्षी पहलगाममध्ये हल्ला झाला. हिंदू मारले गेले. याचा सूड म्हणून भारत पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे. हे काय आहे? आणि हीच भाजप आपल्याला देशभक्ती शिकवणार का? तुम्ही फक्त एका सामन्यापासून मागे हटू शकत नाही का? आपल्या सैनिकांचे शहीदत्व क्रिकेटपेक्षा कमी महत्त्वाचे आहे का? तुम्हाला याचा विचार करण्याची गरज आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या एक्स पोस्टवरूनही निशाणा साधला. खेळाच्या मैदानातही ऑपरेशन सिंदूर झालं असं पंतप्रधान मोदी म्हणाले. "मला वाटते की हे दुर्दैवी आहे की ऑपरेशन सिंदूर, ज्यामध्ये आपल्या सैनिकांनी शौर्य दाखवले, शहीद झाले याची तुलना खेळाशी केली जात आहे. काही लोक म्हणतात की राजकारण आणि खेळाला एकत्र आणू नका. पण जेव्हा दहशतवादी येतात तेव्हा ते विचारतात का? भारतीयांवर ते हल्ले करतात मग आपण त्या देशासोबत का खेळायचं?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Aditya Thackeray criticizes India-Pakistan match after Asia Cup victory.

Web Summary : Aditya Thackeray questioned the need for India to play Pakistan after the Asia Cup win, calling it a 'drama'. He criticized comparing the victory to Operation Sindoor and questioned BJP's patriotism, asking why a match is prioritized over soldiers' sacrifices.
टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानAaditya Thackerayआदित्य ठाकरेOperation Sindoorऑपरेशन सिंदूरBJPभाजपा