शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

निर्णय फिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर वाढता दबाव

By admin | Updated: December 22, 2014 00:44 IST

आघाडी सरकारच्या काळातील मंत्र्यांकडे असलेले पीए, पीएस आणि ओएसडी यांना पुन्हा त्याच पदावर मंत्रालयात न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे.

फडणवीस ठाम : पीए, बदल्या अन् ई-टेंडरयदु जोशी - नागपूरआघाडी सरकारच्या काळातील मंत्र्यांकडे असलेले पीए, पीएस आणि ओएसडी यांना पुन्हा त्याच पदावर मंत्रालयात न घेण्याच्या निर्णयावर ठाम राहण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरविले आहे. त्याचप्रमाणे जे अतिरिक्त जिल्हाधिकारी वा उपजिल्हाधिकारी बदल्यांच्या ठिकाणी जाणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यावरही ते तेवढेच ठाम आहेत. तीन लाख रुपयांवरील कुठल्याही सरकारी कामाचे ई-टेंडर झाले पाहिजे, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी काढला असून, तो बदलण्यासाठी आमदारांकडून आलेला दबावही मुख्यमंत्र्यांनी झुगारला आहे. आपला निर्णय पारदर्शक कारभारासाठी अत्यावश्यक असल्याने तो बदलणार नाही, असे त्यांनी आमदारांना निक्षून सांगितले आहे. पाच लाख वा त्यावरील रकमेच्या कामाचे ई-टेंडर काढावे, अशी आमदारांची मागणी होती. बरेच आमदार त्यांना येऊनही भेटले, पण त्यांनी त्यास नकार दिला. आमदार निधी व विकासाची इतर कामे मजूर सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून घेण्यात येतात. या सोसायट्यांमध्ये बरेचदा स्थानिक लोकप्रतिनिधींचे नातेवाईक वा निकटवर्ती असतात. या मजूर सोसायट्यांनी गेल्या काही वर्षांत केलेले घोटाळे बाहेर काढले गेले तर कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार समोर येईल, असे मत मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकमध्ये वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेले अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मुख्यमंत्र्यांनी विदर्भ, मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात बदल्या केल्या आहेत. आठ दिवसांत रुजू न झाल्यास या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश बदलावा म्हणून अधिकाऱ्यांच्या संघटनेचे नेते विधानभवनात गेल्या आठवडाभर फिरत होते. यासाठी काही मंत्र्यांना हाताशी धरण्याचाही प्रयत्न त्यांनी केला; पण मुख्यमंत्री निर्णय फिरवणार नाहीत. त्यामुळे आम्ही तुम्हाला मदत करू शकत नाही, असे मंत्र्यांनी या नेत्यांना सांगितल्याची माहिती आहे.गेली दहा वर्षे पीए, पीएस, ओएसडी राहिलेले लोक तर अजूनही काही मंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे; पण मुख्यमंत्र्यांनी कोणालाही दाद दिलेली नाही. प्रशासनात पारदर्शकता यावी यासाठी मी घेत असलेल्या निर्णयांमागे कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. राज्याच्या प्रशासनाची उत्तम साथ मला नक्की मिळेल. मागासलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील प्रशासन गतिमान आणि परिणामकारक करण्यासाठी तेथील महसूल अधिकाऱ्यांची पदे भरण्यात आलेली आहेत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.